महाराष्ट्र

NDA Government: प्रतापराव जाधव की श्रीरंग बारणे, केंद्रीय मंत्रीपदावरुन शिवसेनेच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच?

Maharashtra Politics Shinde Group News: राज्यातील महायुतीत मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला एनडीए सरकारमध्ये दोन मंत्रिपदे दिली जाणार आहेत. परंतु या खासदारांपैकी एकाच खासदाराच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार आहे.

Bharat Jadhav

प्रमोद जगताप, साम प्रतिनिधी

नवी दिल्ली: देशात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार येणार असून नरेंद्र मोदी ९ जून रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्याचवेळी काही निर्वाचित खासदारांना खातेवाटप केली जाणार असून त्यांचाही शपथविधी होणार आहे. राज्यातील महायुतीत मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला पहिल्याच मंत्रिमंडाळ विस्तारात दोन खाती दिली जाणार आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तुर्तास एकाच खासदाराच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार आहे. यामुळे या केंद्रीय मंत्रिपदावरून सेनेतील नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू झालीय.

मंत्रिपदासाठी शिवसेनेतील खासदार प्रतापराव जाधव आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्यात रस्सीखेच सुरू केलीय. याच वादामुळे परवा होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात एकाच कॅबिनेट मंत्र्याचा शपथविधी होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.तर उर्वरित १ मंत्रिपद पुढील काळात दिलं जाईल असं आश्वासन शिवसेनेला दिलं जाणार आहे. यामुळे आता दोघांपैकी कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते याकडे लक्ष लागले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Ticket: वंदे भारत तिकीट रद्द केल्यास किती पैसे माघारी मिळणार? तिकीट बुक करण्याआधी हे नियम अवश्य वाचा

Viral Video: पार्किंगमध्ये दुचाकी पार्क केल्याचा राग अनावर अन् मग लाथा- बुक्क्यांनी एकमेंकाना कुट-कुट कुटले; हाणामारीचा व्हिडिओ पाहा

Laapataa Ladies : ऑस्करसाठी 'लापता लेडीज'च्या दिग्दर्शकाने घेतला मोठा निर्णय, थेट नावचं बदललं

Balasaheb Thorat: विशाल पाटील यांना मदत केली, भरसभेत बाळासाहेब थोरातांची कबुली; शिवसेनेची मागितली माफी

Malaika Arora: ८ तास झोप, दारुला बाय बाय... मलायकाचा नोव्हेंबरचा फिटनेस प्लान पाहिलात का?

SCROLL FOR NEXT