Sharad Pawar–Ajit Pawar Alliance in Chandgad Saam Tv
महाराष्ट्र

मोठी बातमी! हसन मुश्रीफ यांच्यामुळे २ राष्ट्रवादी एकत्र, कोल्हापूरचं राजकारण फिरलं

Sharad Pawar–Ajit Pawar Alliance in Chandgad: कोल्हापुरातील चंदगड नगर परिषदेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र. मंत्री हसन मुश्रीफ यांनी दोन्ही गटाच्या युतीत महत्वाची भूमिका बजावली.

Bhagyashree Kamble

  • कोल्हापुरातील चंदगड नगर परिषदेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र.

  • शरद पवार अन् अजित पवार गटाची युती.

  • राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार.

कोल्हापुरातील राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी गटाची ऐतिहासिक युती झाली आहे. चंदगड नगर परिषदेमध्ये ही युती अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. या राजकीय घडामोडीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने दोन्ही गटांमध्ये ही युती घडवून आणण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, या युतीमुळे राष्ट्रवादी पक्षाला मोठा फायदा होणार आहे. दरम्यान, या युतीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आता एकत्रितपणे चंदगडमध्ये निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचं समजतंय.

कोल्हापुरच्या चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी गटाची युती झाली आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने शरद पवार गटाच्या नंदाताई बाभुळकर आणि अजित पवार गटाच्या राजेश पाटील यांच्याच युती झाली आहे. गडहिंग्लज येथील हसन मुश्रीफ यांच्या कार्यालयात युती संदर्भात बैठक झाली असल्याची माहिती आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानं कोल्हापुरातील राजकीय समीकरणांमध्ये बदल घडण्याची शक्यता आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत भाजपविरोधात लढणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी गटाने एकत्र विकास आघाडीची घोषणा केली आहे. या युतीमुळे चंदगडमध्ये राजकीय वारे वेगाने वाहू लागणार आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निश्चितच राष्ट्रवादीला याचा फायदा होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday horoscope: या ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा; नोकरी आणि पैशांच्या बाबतीत काय घडणार?

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

Maharashtra News Live Update: राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT