jayant patil  saam tv
महाराष्ट्र

NCP | सदस्य नोंदणीवरुन जयंत पाटलांचे पदाधिकाऱ्यांना खडेबोल; म्हणाले,' ज्यांना पदे दिली...'

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सदस्य नोंदणी अत्यल्प असल्याने पदाधिकाऱ्यांना पाटील यांनी खडेबोल सुनावले.

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

Jayant Patil News : शिंदे गटाच्या बंडाळीनंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर राज्यात शिंदे गट आणि भाजप युतीचं सरकार सत्तेवर विराजमान झालं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी पार्श्वभूमी वर संघटना बांधणीवर भर देण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सदस्य नोंदणी अत्यल्प असल्याने पदाधिकाऱ्यांना पाटील यांनी खडेबोल सुनावले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. वर्धा जिल्ह्यातील शिववैभव मंगल कार्यालयात जयंत पाटील यांनी संघटना बांधणीच्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांचा आढावा घेतला. यावेळी जिल्ह्यात सदस्य नोंदणी अत्यल्प असल्याने पदाधिकाऱ्यांना पाटील यांनी खडेबोल सुनावले. सोबतच बैठकीला पदाधिकाऱ्यांची संख्या कमी आणि कार्यकर्त्यांची संख्या जास्त असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सदस्य नोंदणीवरून कार्यकर्त्यांना खडेबोल सुनावताना जयंत पाटील म्हणाले,'ज्यांना पदे दिली, ते घरी बसले आहेत. बैठकीत केवळ कार्यकर्ते उपस्थित आहेत. जिल्ह्यात सदस्य नोंदणीबाबत पदाधिकारी गंभीर नसून पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही. तीन महिन्यांपासून सदस्य नोंदणी सुरु आहे तरीही जिल्ह्यात देण्यात आलेले १५०० पुस्तके पूर्ण भरण्यात आली नाही'.

'सदस्य नोंदणीची शेवटची तारीख ही ३१ ऑगस्ट आहे. आता १० सप्टेंबरपर्यंत सर्व नोंदणी करा. पक्ष बळकट करण्यासाठी सर्वांनी काम करून पक्षात येणाऱ्यांसाठी मापदंड लावू नका, अशा सूचना जयंत पाटील यांनी बैठकीत दिल्या. दरम्यान, या बैठकीत जयंत पाटील यांनी सर्वांकडून बूथ कमिटी आणि सदस्य नोंदणीची माहिती घेत सभासद नोंदणीच्या पुस्तकांवरून सर्वांची शाळाच घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तिच्या स्टेप्सना तोड नाही! तरुणीचा नादखुळा डान्स पाहिला का?;VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Hans Mahapurush Rajyog: 12 वर्षांनंतर गुरु वक्री होऊन बनवणार हंस महापुरुष राजयोग, 'या' राशींच्या घरी होणार पैशांचा पाऊस

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! नोकरी करत केली UPSC क्रॅक; IAS नेहा यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

Gaza News Today : गाझात उपासमारीने 124 जणांचा मृत्यू; 50 ग्रॅमचं बिस्किट 750 रुपयांना, VIDEO

SCROLL FOR NEXT