Oil Attack on Sharad Pawar Group Leader Saam
महाराष्ट्र

शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यावर काळे ऑईल ओतले, राजकीय वर्तुळात खळबळ, कारण काय?

Oil Attack on Sharad Pawar Group Leader: शरद पवार गटाचे नेते भारत पाटील यांच्या अंगावर ऑईल फेकले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केली ऑईल फेक.

Bhagyashree Kamble

सोलापुरातील माढा तालुक्यातील टेंभूर्णी येथून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार गटाचे नेते भारत पाटील यांच्या अंगावर काळे ऑईल ओतण्याचा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारत पाटील यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप आहे. याच कारणावरून मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर काळ्या रंगाचे ऑईल ओतून आंघोळ घातली.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी भारत पाटील यांनी वाळू माफियांनी वकिलाला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पोलीस स्टेशवर मोर्चा काढला होता. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप करण्यात आला. हा आरोप मराठा क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याची माहिती आहे.

दरम्यान, हाच राग मनात धरून मराठा क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भारत पाटील यांच्यावर ऑईल फेकण्याचे ठरवले. घटनेच्या दिवशी कार्यकर्त्यांनी भारत पाटील यांच्यावर काळे ऑईल ओतले. हा प्रकार उघडकीस येताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली .

टेंभुर्णी पोलिस ठाण्यावर ग्रामस्थांचा मोर्चा

सोलापूर जिल्ह्यातील माढयातील टेंभुर्णी परिसरातून भीमा नदीच्या पात्रातून रात्रीच्या वेळी बेसुमार वाळू उपसा होतो. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पंपाच्या पाईपचे फुटून नुकसान होते. यामुळे वकील पांडुरंग तोडकर यांनी पोलिसात तक्रारी केल्या होत्या. याच गोष्टीचा राग मनात धरून वाळू माफियांनी करमाळा चौकात पांडुरंग तोडकर यांना बोलावून बेदम मारहाण केली.

मारहाणीत त्यांचे पाय आणि हातावर गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती आहे. पोलीस आणि महसूल प्रशासनाने वाळू माफियांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार घडत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक आणि तहसीलदार यांना निलंबित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. वकील तोडकर यांना न्याय मिळण्यासाठी त्यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे. अवैध वाळू उपसा बंद व्हावा यासाठी नागरिकांकडून मोर्चा काढण्यात आला. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा नागपूर अधिवेशनमध्ये याबाबत मुद्दा उपस्थित केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुर्ती, ड्रेस आणि साड्यांवर सुंदर दिसतील शॉर्ट मंगळसूत्र, लेटेस्ट, ट्रेंडी 5 डिझाईन्स

मोठी बातमी! मनोज जरांगेंची निर्णायक आंदोलनाची घोषणा, तारीखही सांगितली, फडणवीसांना काय दिला इशारा?

Diabetes : पावसाळ्यात थोडासा निष्काळजीपणा मधुमेहींसाठी घातक, 'या' गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास समस्या आणखी वाढेल

Cyber Crime : '1930' सायबर हेल्पलाइनच ठरली फसवणुकीचे हत्यार; खाती गोठवून लाखोंची खंडणी, आरोपी गजाआड

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा गावात अन्न औषध प्रशासन विभागाची धाड

SCROLL FOR NEXT