राष्ट्रवादी काँग्रेस आढावा बैठकीत कार्यकर्त्यांची अंतर्गत गटबाजी उघड भूषण अहिरे
महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस आढावा बैठकीत कार्यकर्त्यांची अंतर्गत गटबाजी उघड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचा आढावा घेण्यासाठी आलेले पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष जावेद हबीब यांच्या समोरच आज धुळ्यात अल्पसंख्याक विभागातील गटबाजीचे दर्शन घडले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण अहिरे

धुळे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचा आढावा घेण्यासाठी आलेले पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष जावेद हबीब यांच्या समोरच आज धुळ्यात अल्पसंख्याक विभागातील गटबाजीचे दर्शन घडले. NCP review meeting reveals internal factionalism of activists

हे देखील पहा -

बैठकीच्या सुरुवातीलाच अल्पसंख्याक विभागाच्या काही कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावर लावलेल्या फलकावर आक्षेप घेतला. त्या फलकात काही नेत्यांचे फोटोच नाहीत. जेष्ठ नेत्यांना किंमत देत नाही असे आरोप करीत शहराध्यक्ष जमीर शेख विरुध्द आक्रमक भुमिका घेत बॅनर वर स्थानिक नेत्यांचे फोटो नसल्याचा राग येऊन कार्यकर्त्यांनी बॅनर काढून फेकले.

तसेच कार्यकर्त्यांच्या बैठकीदरम्यान स्थानिक नेत्यांना मान दिला जात नसल्याच्या विषयावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबईहून आलेले प्रदेश कार्याध्यक्ष त्यांच्यासमोरच समोरच हा सर्व गोंधळ सुरू असल्यामुळे धुळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे बघावयास मिळाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष जोवद हबीब यांनी धुळ्यातील गटबाजी बघून नाराजी सुध्दा व्यक्त केली. परंतु पत्रकारांशी बोलताना हबीब यांनी कार्यकर्त्यांची सारवासारव देखील केल्याचे बघावयास मिळाले.

जावेद हबीब हे संघटनात्मक कामकाजासाठी धुळे दौऱ्यावर आले होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत अल्पसंख्याक विभागाची आढावा बैठक वादाच्या सावटाखालीच धुळ्यातील राष्ट्रवादी भवनात घेण्यात आली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सलग तिसऱ्या दिवशी अजित पवार नाशिक दौऱ्यावर

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरात 'या' ठिकाणी ठेवा मोराचे पिस

EIL Recruitment: इंजिनियर झालात? या कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी, पगार २ लाख रुपये; अर्ज कसा करावा?

Aditya Roy Kapoor : व्हायचं होतं क्रिकेटर, झाला अभिनेता; एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले

Sangli Politics: बंटी पाटलांसारखं वागलो तर जिल्ह्यात एकही पक्ष शिल्लक राहणार नाही, विश्वजीत कदम यांनी पवारांच्या राष्ट्रवादीला खडसावलं

SCROLL FOR NEXT