टेरेसवर व्यायाम करणाऱ्या स्टेट बँकेच्या सेवानिवृत्त अधिकार्‍याचा खून

स्टेट बँकेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यास अशा पद्धतीने का मारले असावे याबाबत तर्कवितर्क लढविले जात असून या दुर्घटनेची माहिती पसरताच संपूर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
टेरेसवर व्यायाम करणाऱ्या स्टेट बँकेच्या सेवानिवृत्त अधिकार्‍याचा खून
टेरेसवर व्यायाम करणाऱ्या स्टेट बँकेच्या सेवानिवृत्त अधिकार्‍याचा खून Saam Tv
Published On

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरातील राजहंस कॉलनी मध्ये राहणाऱ्या स्टेट बँकेतील सेवानिवृत्त अधिकारी श्रीराव हे टेरेसवर व्यायाम करत असताना अज्ञात इसमाने त्यांच्या डोक्यात जोरदार प्रहार करून खून केला आहे. गुन्हा करून हा अज्ञात इसम तिथून पसार झाला आहे. या हल्ल्यामध्ये श्रीराव यांचा जागीच मृत्यू झाला आहे. Murder of a retired State Bank official

हे देखील पहा -

धुळे शहर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनेचा संपूर्ण पंचनामा करत पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास धुळे शहर पोलिस करीत आहेत.

टेरेसवर व्यायाम करणाऱ्या स्टेट बँकेच्या सेवानिवृत्त अधिकार्‍याचा खून
हे सरकार पाच वर्षे टिकणार- बच्चू कडू

स्टेट बँकेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यास अशा पद्धतीने का मारले असावे याबाबत तर्कवितर्क लढविले जात असून या दुर्घटनेची माहिती परिसरात पसरताच संपूर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com