maharashtra politics  Saam tv
महाराष्ट्र

शरद पवार आणि अजितदादांची राष्ट्रवादी एक होणार? शोक सभेदरम्यान बड्या नेत्याने तारीखच सांगितली

maharashtra politics : शरद पवार आणि अजितदादांची राष्ट्र्वादी एक होणार असल्याचा दावा बड्या नेत्याने केला आहे. या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Vishal Gangurde

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू

बीडच्या नेत्याच्या वक्तव्यामुळे संभाव्य तारखेची चर्चा

दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याची इच्छा व्यक्त करण्यात आलीये

योगेश काशिद, साम टीव्ही

अजित पवारांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात राजकीय नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. अजितदादांच्या जाण्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने राष्ट्रवादीतील नेतेमंडळी, कार्यकर्ते शोकाकुल झाले आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावे, अशी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची भावना असल्याचे समोर येत आहे. यादरम्यान अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी शोक सभेदरम्यान दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार असल्याचा दावा केला आहे. या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस येत्या आठ तारखेला एक होईल, याची घोषणा होईल, असा दावा बीडचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी केला. आठ ते दहा तारखेच्या दरम्यान दोन्ही पक्षाचे विलीनीकरण जाहीर होईल. त्यानंतर पुन्हा कामाला लागू, असे विधान अजित पवारांच्या शोक सभेदरम्यान करण्यात आलं.

शरद पवार आणि अजितदादा दोघांच्या कार्यकर्त्यांना एक व्हायचं आहे. दोघे एकत्र येऊन शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचे राजकारण महाराष्ट्रात करायचे आहे. जनतेसाठी अहोरात्र काम करणारा माणूस आपल्यातून निघून गेला. एकमेकांना भेटताना विकासाचे बोलू आणि काम करू आणि पुन्हा पक्ष उभारू अशी भूमिका दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर जिल्हाध्यक्षांनी मांडली.

अजित पवारांना श्रद्धांजली वाहताना आमदार संदीप क्षीरसागर यांना अश्रू अनावर

अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने शोक सभेचे आयोजन करण्यात आले होतं. यावेळी बोलताना आमदार संदीप क्षीरसागर यांना अश्रू अनावर झाले. दोन्ही राष्ट्रवादी वेगळ्या झाल्या. तेव्हा आम्ही साहेबांना म्हणत होतो की, अजितदादांच्या हातात तुम्ही सूत्र द्या.. आता देखील पवार कुटुंब एकत्र बसून जो निर्णय घेईल. आम्ही त्या निर्णयासोबत राहणार आहोत. पवार कुटुंबाशिवाय आम्हाला काहीच दिसत नाही, अशा भावना आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या पार्थिवाचे राख सावडण्याच्या कार्यक्रमाला दादांचा मंत्री, आमदार उपस्थितीत नसल्याची लवांडे यांनी केली व्यक्त खंत

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्र अव्वल; गणेशोत्सव चित्ररथाने मिळवला सर्वोच्च बहुमान

राज्याला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार, शपथविधी उद्याच होणार? भुजबळांनी दिली सविस्तर माहिती

E-Sakal No1 Marathi News: महाराष्ट्रात आम्हालाच वाचकांची पहिली पसंती; डिजिटल पत्रकारितेत ई-सकाळ सलग दुसऱ्यांदा ठरला नंबर 1

महाराष्ट्र हादरला! एकट्यात बसलेल्या मुलीवर वाकडी नजर; नराधमाकडून स्वतःच्या घरी नेऊन अत्याचार

SCROLL FOR NEXT