Sharad Pawar, Ajit Pawar, Rohit Pawar, Satara, Karad saam tv
महाराष्ट्र

Sharad Pawar In Karad: अरं... आपलं आबा हायेत आबा! आमदार काल अजितदादांसोबत, आज शरद पवारांसोबत कारमध्ये; कार्यकर्ते खूश

Sharad Pawar Latest Update : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे घोषणाबाजी करून कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी स्वागत केले.

Siddharth Latkar

Satara News : देश का नेता कैसा हाे ? शरद पवार जैसा हाे...शरद पवार आगे बढाे हमी तुम्हारे साथ है अशा घाेषणांनी आज (साेमवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar In Karad) यांचे सातारा जिल्ह्यात एनसीपीच्या (NCP) कार्यकर्त्यांनी जाेरदार स्वागत केले. अजित पवार यांच्या बंडानंतर एनसीपी अध्यक्ष शरद पवार हे कराड येथील यशवंतराव चव्हाण समाधीस्थळास भेट देण्यासाठी आलेत. (Maharashtra News)

दरम्यान पवार हे सातारा जिल्ह्यात करत असताना त्यांच्या कारच्या भाेवती शिंदेवाडी (ता.खंडाळा ) येथे कार्यकर्त्यांनी माेठा गराडा घाडला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी जाेरदार घाेषणाबाजी केली. काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांचे पुष्पहार देत स्वागत केले. त्यावेळी पवार यांच्या कारमध्ये आमदार राेहित पवार (Rohit Pawar) हे देखील हाेते.

दरम्यान शरद पवार हे सातारा (Satara) येथे आल्यानंतर त्यांच्या कारमध्ये आमदार मकरंद पाटील हे बसलेले अनेकांनी पाहिले. अजित पवार यांच्या बंडानंतर (ajit pawar rebellion) मकरंद पाटील (makrand patil) हे त्यांच्या समवेत असल्याची चर्चा हाेती. आज आमदार मकरंद पाटील यांना शरद पवारांसमवेत पाहून अनेकांचे भुवया उंचावल्या.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हाफिज सईद पुन्हा भारतावर हल्ल्याच्या तयारीत, बांगलादेशातून...., 'त्या' व्हिडिओमुळे खळबळ

Healthy Chaat: चटकदार अन् कुरकुरीत खाण्याची इच्छा होतेय? जंक फूड सोडा, घरीच तयार करा 'हा' पदार्थ, लहान मुलंही आवडीनं खातील

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो, हे काम कराच, अन्यथा ₹ १५०० रूपये होतील

Wedding Special Outfit: लेहेंग्यापासून साडीपर्यंत...; लग्नसराईत या आऊटफिटमुळे मिळेल एक ग्लॅमरस लूक

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

SCROLL FOR NEXT