
- सचिन बनसाेडे
Shirdi News : मी नेहमीच साईबाबांच्या (shirdi sai baba) दर्शनाला येत असतो. सर्वांवरती आशीर्वाद राहु द्या अशी साईंच्या चरणी प्रार्थना केली. कुटुंबीयांसाठीही साईबाबांकडे प्रार्थना केली अशी भावना भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (shivendraraje bhosale) यांनी व्यक्त केले. राजे आज शिर्डीत (shivendraraje in shirdi) साईंच्या दर्शनासाठी आले हाेते. त्यावेळी त्यांनी साम टीव्हीशी संवाद साधला. (Maharashtra News)
समृद्धी महामार्गावर झालेल्या बस अपघाताबाबत बाेलताना शिवेंद्रराजे म्हणाले झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. ज्या कुटुंबावर संकट कोसळले त्यांच्या दुःखाचा आपण अंदाजही लावू शकत नाही. त्या कुटुंबांना दुःखातून बाहेर पडण्याची ताकद मिळो.
समृद्धीच्या अपघातावरून (Accident at Samruddhi Mahamarg) राजकारण करणे योग्य नाही असेही राजेंनी नमूद केले. ते म्हणाले फक्त रस्त्याला दोष देऊन चालणार नाही तर अपघातांची चौकशी देखील झाली पाहिजे तसेच शासनाने योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात.
औरंगजेब उदात्तीकरण
भाजप आणि मोदींकडून छत्रपतींचा मान सन्मान ठेवण्याचं सातत्याने काम केले जात आहे. राज्यातही छत्रपतींसोबत सर्व महापूरूषांचा सन्मान ठेवला जात आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रात औरंगजेबाचं उद्दातीकरण केलं जात आहे अशी खंत शिवेंद्रसिंहराजेंनी व्यक्त केली.
ते म्हणाले राजकारणासाठी हे करणं चुकीचं आहे. मुस्लिम बांधवही औरंगजेब आपल्या हिताचा होता असं मानत नाहीत. महाराष्ट्राची ओळख छत्रपतींमुळेच राहणार असून कोणी कितीही प्रयत्न केला तरी छत्रपतींना कमी लेखण्याचा डाव यशस्वी होवू देणार नाही असा इशारा राजेंनी दिला. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम वर देखील टिका केली.
...तर संघर्ष हाेणारच
सातारा मार्केट कमिटीच्या बाबतीत सर्वांनी कायदेशीर माहिती घेतली पाहिजे. आमची बाजू योग्य असल्याने कोर्टाचा निर्णयही आमच्या बाजूने आहे. डेव्हलपमेंटसाठी मार्केट उभं करायला चाललोय. त्यात आमचा वैयक्तिक फायदा नाही असे शिवेंद्रसिंहराजेंनी नुकत्याच साता-यात उदयनराजेंशी झालेल्या संघर्षावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले विकासाला कुणी आडवा येत असेल तर संघर्ष होणारच. ज्यांचा प्रकल्पाला विरोध असेल त्यांनी कोर्टात जावं असेही त्यांनी नूमद केले.
मंत्रीमंडळ विस्तार
सातारा जिल्ह्यातून भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गाेरे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले आणि शिंदे गटातील आमदार महेश शिंदे यापैकी काेणाची राज्य मंत्रीमंडळात वर्णी लागणार याची उत्सकुता सातारकरांना लागली आहे.
राज्यात मंत्रीमंडळाचा विस्तार (mantrimandal vistar) कधी हाेईल व तुम्हांला मंत्रीपद मिळेल का असा शिर्डीत आलेल्या शिवेंद्रसिंहराजे यांना प्रश्न केला असता ते म्हणाले, मंत्रीपदाचा निर्णय पक्ष आणि देवेंद्र फडणवीस घेतील. देवेंद्रजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतील याची खात्री आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.