Nilesh Lanke Criticized Ajit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

NCP Politics: 'नगर आणि माढा'वरून जुंपली! निलेश लंके यांचा अजित पवारांवर पलटवार; म्हणाले, 'शिळ्या कढीला ऊत...' VIDEO

Nilesh Lanke Criticized Ajit Pawar On Ahmednagar Madha Constituency: लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार गटात चुरस पाहायला मिळाली. अहमदनगरमधून निलेश लंके विजयी झाले होते.

Rohini Gudaghe

विजय पाटील साम टीव्ही, सांगली

राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू झालीय. परंतु लोकसभेच्या निकालावरून अजुनही अजित पवार आणि शरद पवार गटात शा‍ब्दिक चकमक सुरूच आहे. अशातच आता नगर आणि माढावरून निलेश लंके आणि अजित पवारांमध्ये जुंपल्याचं समोर आलंय.

'नगर आणि माढा'वरून जुंपली

नगर आणि माढाबाबत करण्यात आलेलं वक्तव्य म्हणजे शिळ्या कढीला उत देण्याचा प्रकार आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी (Nilesh Lanke Criticized Ajit Pawar) अजित पवारांवर केलीय. तसेच मी आणि धैर्यशील मोहिते पाटील निवडून आलो आहे, खासदार झालोय. आता त्या गोष्टीला महत्त्व राहिले नाही, असंही खासदार निलेश लंके म्हणाले आहेत.

निलेश लंकेचा अजित पवारांना पलटवार

दक्षिण नगरमधून निलेश लंके आणि माढ्यातून मोहिते पाटलांना महायुतीतून उमेदवारी देण्यात येणार (Ahmednagar Madha Constituency) होती. पण भाजपाने आम्हाला जागा सोडल्या नाहीत, असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं. आता या वक्त्यव्यावरून निलेश लंके यांनी अजित पवारांवर पलटवर केलाय. ते सांगलीच्या जतमधील उमदी येथे बोलत होते. लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार गटात मोठी चुरस पाहायला मिळाली (NCP Politics) होती. आता विधानसभेसाठी दोन्ही गटांची मोर्चेबांधणी सुरू असल्याचं चित्र आहे.

विधानसभेसाठी दोन्ही गटांची मोर्चेबांधणी सुरू

अजित पवारांनी राज्यात सर्व्हे आणि ५४ जागांवर दावा केलाय. याबाबत बोलताना लंके म्हणाले की, अजित पवार हे महायुतीमधील घटक पक्षाचे नेते आहेत . त्यामध्ये त्यांनी कुठल्या जागा घ्यायच्या, तो त्यांच्या पक्षाचा आणि महायुतीचा अधिकार आहे. त्यावर आपण बोलणे योग्य नसल्याची भूमिका लंके यांनी स्पष्ट केलीय. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार (Sharad Pawar) असेल. जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीतील आमचे नेते ठरवतील, असंही खासदार निलेश लंके यांनी स्पष्ट केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIP Number Registration: कार, बाईकसाठी VIP नंबर मिळवायचाय? आता घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने करा रजिस्ट्रेशन

1 महिना मेथीचं पाणी प्यायल्याने शरीरात काय बदल होतात?

Maharashtra Politics : विधानसभा निवडणूक निकालानंतर मोठा राजकीय भूकंप?; मविआचे अनेक आमदार CM शिंदेंच्या संपर्कात

Bigg Boss फेम अभिनेत्रीला ओळखलात का?

आयुष्याचा जोडीदार निवडताना अडचणी येतात? 'Acharya Chanakya' यांच्या 5 गोष्टी लक्षात ठेवा, भेटेल जन्मभराची साथ

SCROLL FOR NEXT