Viral Video
Viral Video  Saam Tv
महाराष्ट्र

Viral Video : मुलांना शाळेत जाण्यासाठी बस का थांबवली नाही? NCP पदाधिकाऱ्याची ST बसच्या चालकाला मारहाण

संदीप नागरे

Hingoli News : हिंगोलीतून मारहाणीचं वृत्त समोर आलं आहे. हिंगोलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने चालकाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. हिंगोलीतील मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी पोलिसांत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील डोंगरकडाजवळ एसटी महामंडळाच्या चालकाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली आहे. स्वत:च्या मुलाला शाळेत जाण्यासाठी बस का थांबवली नाही, या कारणावरून ही मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने मारहाण करताना आजूबाजूला अनेक लोक जमा झाले.

एसटी बसमधील एका महिलेने व्हिडिओ मोबाईलच्या कॅमेरात कैद केला आहे. तर मारहाण झाल्यानंतर एसटी चालक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याशी युक्तिवाद करताना दिसत आहे. या व्हिडिओत महिला वडील आणि मुलाने एसटी चालकाला मारहाण केल्याचा दावा करत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Maharashtra Latest News)

या प्रकरणी पोलीस म्हणाले, स्वतःच्या मुलांना शाळेत जाण्यासाठी बस का थांबवली नाही या कारणावरून ही मारहाण झाल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी एसटी महामंडळाचे चालक बाबुराव मोरे यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी राष्ट्रवादीचा पदाधिकारी विजय गावंडे याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup 2024: २९ दिवस, २० संघ अन् ५५ सामने.. उद्यापासून T20 वर्ल्डकपचा थरार; संपूर्ण शेड्यूल पाहा एका क्लिकवर

NCP Working President : लोकसभा निकालाआधी 'राष्ट्रावादी'त मोठ्या घडामोडी; राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळे यांची निवड

Lok Sabha Voting Live Update: लोकसभा मतदानाच्या शेवटच्या टप्प्यादरम्यान 'इंडिया' आघाडीची बैठक सुरू

Kajal Aggarwal : समर सिझनसाठी काजलचं हटके शर्ट आणि स्कर्टमध्ये फोटोशूट

Railway Viral Video: अरे बापरे! प्रवाशाला लाथाबुक्क्यांनी मारलं, रेल्वे स्थानकावर कर्मचाऱ्यांची गुंडगिरी, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT