Dr Amol Kolhe, CM Eknath Shinde SAAM TV
महाराष्ट्र

...तर CM एकनाथ शिंदेंनी किल्ले शिवनेरीवर येऊ नये; अमोल कोल्हे संतापले

राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना छत्रपती शिवरायांच्या आग्र्याहून सुटकेच्या ऐतिहासिक घटनेशी केल्यानंतर पुन्हा वादाला तोंड फुटलं आहे.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

नवनीत तापडिया

Aurangabad News : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर आता राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाची तुलना छत्रपती शिवरायांच्या आग्र्याहून सुटकेच्या ऐतिहासिक घटनेशी केल्यानंतर पुन्हा वादाला तोंड फुटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी यावरून थेट मुख्यमंत्री शिंदेंना इशारा दिला आहे.

राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज, बुधवारी आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना थेट शिवाजी महाराज यांच्या आग्र्याच्या सुटकेच्या घटनेशी केली. यावरून लोढा यांच्यावर टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी यावरून टीकास्त्र सोडलं आहे. (Maharashtra Politics News)

मूळ मुद्द्यांपासून राज्यातील जनतेची दिशाभूल करण्यासाठी अशी वक्तव्ये वारंवार केली जात आहेत. यापुढे शिवाजी महाराजांबद्दल अशी वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत, असा इशारा कोल्हे यांनी यावेळी दिला. शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये थांबवता येत नसतील, तर येणाऱ्या शिवजयंतीला मुख्यमंत्र्यांनी किल्ले शिवनेरीवर पाय ठेवू नये, असंही कोल्हे म्हणाले.  (Latest Marathi News)

'लोढा यांनी तात्काळ माफी मागावी'

शिंदेंच्या बंडाची तुलना छत्रपती शिवरायांच्या आग्र्याच्या सुटकेच्या घटनेशी केल्यानंतर मंगलप्रभात लोढा हे टीकेचे धनी ठरले आहेत. त्यांच्यावर आमदार अमोल मिटकरी यांनी टीकास्त्र सोडलं. लोढा यांना इतिहास माहिती असण्याची सुतराम शक्यता नाही. धक्कादायक बाब म्हणजे शंभूराजे यांनी त्यांच्या वक्तव्याचे समर्थन केलं आहे. म्हणजे शिंदे गटाचे समर्थन करत आहेत का? तत्काळ मंगलप्रभात लोढा यांनी माफी मागावी, असं मिटकरी म्हणाले.

मंगप्रभात लोढा नेमके काय म्हणाले?

प्रतापगडावर शिवप्रतापदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उपस्थितांना संबोधित केले. छत्रपती शिवाजी महाराज यांना औरंगाजेबाने पकडून आग्र्याच्या किल्ल्यात जेव्हा बंदीस्त केलं होतं. त्यावेळी शिवाजी महाराजांनी स्वत: साठी नाही, तर हिंदवी स्वराज्यासाठी युक्ती काढत सुटका करून घेतली. त्यामुळेच भारतात हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. असाच प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचा झाला. पण एकनाथ शिंदे यांनी सुद्धा तशीच सुटका करून घेतली आणि महाराष्ट्रात हिंदुत्वाचं सरकार स्थापन झालं, असं मंगलप्रभात लोढा म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत पोलीस वसाहतीत स्लॅब कोसळला, भीतीपोटी पोलीस अधिकाऱ्यानं सरकारी घर सोडलं

Maharashtra Rain Alert: राज्यात पुढचे ३ दिवस तुफान पावसाचे, रेड- ऑरेंज अलर्ट; कोणत्या जिल्ह्यात कसा पडणार पाऊस?

Maharashtra Rain Live News: कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पाऊस

Elvish Yadav: 'मी आणि माझे कुटुंब...'; गोळीबाराच्या घटनेनंतर एल्विश यादवची पहिली प्रतिक्रिया

Police Attacked : मोर्चाला हिंसक वळण, पोलीस अधिकाऱ्यावर धारदार शस्त्राने वार, नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT