Mangal Prabhat Lodha Offensive Statement : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एक असं विधान केलं आहे, ज्याने वाद निर्माण होऊ शकतो. 'छत्रपती शिवाजी महाराजांना जसं औरंगाजेबाने कैद केलं होतं, तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना कैद केलं, जसे शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेतून बाहेर पडले तसे शिंदेही पडले', असं विधान मंगलप्रभात लोढा यांनी केलं आहे. (Latest Marathi News)
मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत तुलना केल्याने मोठा वाद निर्माण होऊ शकतो. एकीकडे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यात वाद पेटला असतानाच, आता दुसरीकडे मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics News)
प्रतापगडावर आज 363 वा शिवप्रतापदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह शिंदे फडणवीस सरकारमधील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केलं. त्यांच्यानंतर पर्यटनमंत्री मंगप्रभात लोढा यांनी सुद्धा भाषण करत उपस्थितांना संबोधित केलं.
काय म्हणाले मंगप्रभात लोढा?
प्रतापगडावरील उपस्थिताना संबोधित करताना मंगलप्रभात लोढा म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांना औरंगाजेबाने पकडून आग्र्याच्या किल्ल्यात जेव्हा बंदीस्त केलं होतं. त्यावेळी शिवाजी महाराज हे स्वत: साठी नाही तर हिंदवी स्वराज्यासाठी युक्ती काढत सुटका करून घेतली. त्यामुळेच भारतात हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. असाच प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचा झाला. पण एकनाथ शिंदे यांनी सुद्धा तशीच सुटका करून घेतली आणि महाराष्ट्रात हिंदुत्वाचं सरकार स्थापन झालं, असं मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं आहे.
आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला संताप
दरम्यान, मंगलप्रभात लोढा यांच्या या वक्तव्यावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. "भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं हे वक्तव्य चुकून आलेलं आहे किंवा भाषणाच्या ओघात त्यांनी अशी तुलना केली, असं मी मानत नाही. त्यांचं हे वक्तव्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. महाराष्ट्राचा अपमान आहे. भाजपचा हा एक प्लॅन आहे. महाराजांचा अपमान हा भारतीय जनता पक्षाचा एककलमी कार्यक्रम झालेला आहे", असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.