Tukaram Mundhe Transfer: तुकाराम मुंढेंची 2 महिन्यात पुन्हा बदली; आतापर्यंत कुठे कुठे झाल्या बदल्या?

डॅशिंग आयएएस अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंढे यांची अवघ्या दोन महिन्यात पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे.
IAS Tukaram Mundhe Latest News
IAS Tukaram Mundhe Latest NewsSaam TV

Tukaram Mundhe News: डॅशिंग आयएएस अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंढे यांची अवघ्या दोन महिन्यात पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. मंगळवारी राज्यातील 6 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सध्या तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्याकडे कोणत्याही खात्याचा कारभार देण्यात आलेला नाही.  (IAS Tukaram Mundhe Latest News)

IAS Tukaram Mundhe Latest News
उत्तरप्रदेशात मोठी दुर्घटना! फर्निचर दुकानाला भीषण आग; एकाच कुटुंबातील ६ जणांचा होरपळून मृत्यू

तुकाराम मुंढे हे 2005 सालच्या आयएसएस बॅचचे अधिकारी आहेत. आक्रमक कार्यशैली तसेच तितकेच शिस्तबद्ध असलेल्या तुकाराम मुंढे यांची अनेकदा बदली झाली आहे. तुकाराम मुंढे यांची 16 वर्षाच्या सेवेत तब्बल 19 वेळा वेळा बदली झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस तुकाराम मुंढे यांच्यावर आरोग्य विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. डॉ. रामस्वामी एन. यांच्याकडून मुंढे यांनी पदभार स्वीकारला होता.

कर्मचाऱ्यांना कडक शिस्त लावण्याच्या हेतुनं मुंढे जी पावले उचलतात, तीच बदल्यासाठी कारण असल्याची चर्चा सुरु आहे. दोन महिन्यापूर्वीच तुकाराम मुंढे यांची बदली झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांची बदली करण्यात आली आहे. पाहूयात तुकाराम मुंढे यांची आतापर्यंत कुठे कुठे आणि कधी कधी बदली झाली?

ऑगस्ट 2005 - प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी सोलापूर

सप्टेंबर 2007 - उप जिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग

जानेवारी 2008 - सीईओ, जिल्हा परिषद नागपूर

मार्च 2009 - आयुक्त, आदिवासी विभाग

जुलै 2009 - सीईओ, वाशिम

जून 2010 - सीईओ, कल्याण

जून 2011 - जिल्हाधिकारी, जालना

सप्टेंबर 2012 - विक्रीकर सहआयुक्त मुंबई

नोव्हेंबर 2014 - सोलापूर जिल्हाधिकारी

मे 2016 - आयुक्त, नवी मुंबई महापालिका

मार्च 2017 - मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे

फेब्रुवारी 2018 - आयुक्त, नाशिक महापालिका

नोव्हेंबर 2018 - सहसचिव, नियोजन

डिसेंबर 2018 -प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई

जानेवारी 2020 - आयुक्त, नागपूर महापालिका

ऑगस्ट 2020 - सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई

जानेवारी 2021 - राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत

सप्टेंबर - 2022 - आयुक्‍त आरोग्‍य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com