Suresh Dhas : मोठी बातमी! भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

बीडमधील भाजपा आमदार सुरेश धस यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साम टीव्हीच्या बातमीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
BJP Mla Suresh Dhas Latest News
BJP Mla Suresh Dhas Latest NewsSaam TV
Published On

BJP Mla Suresh Dhas Latest News : बीडमधील भाजपा आमदार सुरेश धस यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साम टीव्हीच्या बातमीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील ८ देवस्थानाच्या जमीनी लाटल्याचा आरोप सुरेश धस आणि त्यांच्या कुटुंबीयांवर केला आहे. गेल्या वर्षभरापासून साम टीव्हीने याबाबतची बातमी लावून धरली होती. (Latest Marathi News)

BJP Mla Suresh Dhas Latest News
Tukaram Mundhe Transfer: तुकाराम मुंढेंची 2 महिन्यात पुन्हा बदली; आतापर्यंत कुठे कुठे झाल्या बदल्या?

आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यासह त्यांच्या पत्नी, भाऊ, मनोज रत्नपारखे आणि अस्लम पठाण यांच्यासह अनेक लोक यामध्ये सामील आहे. अखेर आज सुरेश धस यांच्यासह संबधितांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 चे 13 (1) (अ) (ब), 13 (2) ipc 465,468,471,120 ब, 109 नुसार आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विशेष बाब म्हणजे, औरंगाबाद खंडपीठाने याप्रकरणातील तक्रारदाराचे निवेदनच एफआयआर म्हणून गृहीत धरावे, असे सांगितले होते. त्यानंतर आमदार सुरेश धस यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. मात्र जे औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिले होते, तेच आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवले होते. त्यानंतर बीडच्या लाचलुचपत पथकाने मंगळवारी रात्री उशीरा आमदार सुरेश धस यांच्यासह संबधितांवर गुन्हे दाखल केले आहेत. (Maharashtra Politics News)

BJP Mla Suresh Dhas Latest News
Vikram Kirloskar : टोयोटा किर्लोस्कर मोटारचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

काय आहे प्रकरण?

बीड जिल्ह्यात वक्फ बोर्डच्या जमीन घोटाळ्यानंतर हिंदू देवस्थानच्या जमिनीची बेकायदेशीर हस्तांतरणाची 8 प्रकरणे समोर आली होती. आणि याचीच पोलखोल ग्राउंड वरून साम टीव्हीने बातमी दाखवत केली होती. त्यानंतर याचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आला होता. मात्र एसआयटीने अहवाल दिल्यावरही फौजदारी कारवाई न झाल्याने राम खाडे यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. वर्षभरापासून साम टीव्हीने याबाबतची बातमी सुद्धा लावून धरली होती.

त्यानंतर कोर्टाने या प्रकरणाची दखल घेत आष्टी तालुक्यातील विठोबा देवस्थान, मुर्शदपूर, विठोबा देवस्थान, पांढरी, विठोबा देवस्थान, खडकत, खंडोबा देवस्थान, बेलगाव, श्रीरामचंद्र देवस्थान, आष्टी, श्रीरामचंद्र देवस्थान, चिखली, श्रीरामचंद्र देवस्थान, चिंचपूर व पिंपळेश्वर देवस्थान, आष्टी या देवस्थानांच्या कथित जमीन घोटाळा प्रकरणात आधी फौजदारी गुन्हे नोंद करा व नंतर तपास करा, असे आदेश दिले होते. अखेर कोर्टाच्या आदेशानंतर सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com