Saroj Ahire  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Political News : शरद पवार मला वडिलांसारखे, तर दादांचे माझ्यावर खूप उपकार; NCPच्या सरोज अहिरे नेमकं काय म्हणाल्या?

Ajit Pawar VS Sharad Pawar : मी अजित पवारांना भेटले त्यानंतर काल शरद पवारांना देखील भेटून आले.

अभिजीत सोनावणे

Nashik News : राष्ट्रवादीच्या नाशिकमधील देवळाली येथील आमदार सरोज अहिरे नॉट रिजेबल होत्या. त्यामुळे त्या नेमक्या शरद पवार की अजित पवार कुणाच्या बाजूने आहेत, हे स्पष्ट नव्हतं. मात्र त्यांना आज माध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली. पवारसाहेब आणि अजितदादा यांच्यापैकी एकाला निवडणे आमच्यासाठी जीवन मरणासारखा प्रश्न आहे, असं सरोज अहिरे यांनी म्हटलं.

मी अजित पवार यांना भेटले त्यानंतर काल शरद पवारांना देखील भेटून आले. सुप्रिया ताईंशीही माझं बोलणं झालं आहे. तब्येत ठीक नसल्याने सध्या अॅडमिट झाले आहे. मात्र लवकरच माझ्या मतदारसंघातील नागरिक आणि नेत्यांशी बोलून योग्य तो निर्णय घेणार असल्याचं सरोज अहिरे यांनी यांनी सांगितलं आहे.

मी गिरीश महाजन यांच्यामुळे निवडून आलेली नाही, तसं असेल तर दाखवा, मी राजीनामा देईन. दोन मेळावे, दोन गट यामुळे मानसिक त्रास होत आहे. त्यामुळेच मला अॅडमिट व्हावं लागलं आहे. अजित पवारांच्या समर्थनार्थ सर्व आमदार सही करत होते, मी देखील सही केली. मात्र त्यानंतर मी लगेच सुप्रिया ताईंशी बोलले, असंही सरोज अहिरे यांनी सांगितलं.  (Latest Marathi News)

मी निगरगट्ट राजकारणी नाही, मी भावनिक आहे. माझ्यासाठी दोघांमधून एकाला निवडणे कठीण आहे. हा माझ्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न आहे. मी सही केल्यामुळे अजितदादा माझा पाठिंबा आहे, हे गृहीत धरू शकतात. पण मी माझी भूमिका अधिवेशनापूर्वी मांडेन, असं सरोज अहिरे यांनी म्हटलं.

शरद पवार माझे गुरू, माझ्या वडिलांसारखे आहेत. दादा मोठे नेते आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत. मी आता कुठे मतदारसंघात पाय रोवत आहे. त्यामुळे मतदासंघांतील लोकांशी बोलून निर्णय घ्यावा लागेल, असंही त्यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

Parenting Tips: मुलांना आपले मित्र बनवायचंय? तर फॉलो करा 'या' टिप्स

Dabeli Bhaji Recipe : दाबेलीसाठी परफेक्ट भाजी कशी बनवाल? वाचा सीक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

SCROLL FOR NEXT