Sharad PAwar - Chagan Bhujbal
Sharad PAwar - Chagan BhujbalSaam TV

Sharad Pawar on Chagan Bhujbal : मी जातो, बघतो आणि तुम्हाला सांगतो, असं सांगून गेले अन् शपथच घेतली; शरद पवारांनी भुजबळांची घेतली फिरकी

NCP Split News : राष्ट्रवादीत फुट पडण्याच्या २-३ दिवस आधी त्यांनी (छगन भुजबळ) मला फोन केला होता.
Published on

Sharad Pawar Speech : राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवारांनी आपल्या जाहीर भाषणात  अजित पवार, छगन भुजबळांसह सर्वच बंडखोरांवर टीकास्त्र सोडलं. छगन भुजबळ जेलमधून परतल्यानंतर काहींनी विरोध केला तरी त्यांना तिकीट दिलं आणि मंत्रिमंडळात मंत्रिपदही दिलं याची आठवणही पवारांनी यावेळी करुन दिली. मात्र ते जरा बघून आलो सांगून गेले अन् शपथच घेतली, असा किस्साही शरद पवारांनी सांगितलं.

राष्ट्रवादीत फुट पडण्याच्या २-३ दिवस आधी त्यांनी (छगन भुजबळ) मला फोन केला होता. पक्षात काय चाललंय अशी विचारणा त्यांनी मला केली. काहीतरी घडत आहे, पण मला माहिती नाही, असं मीही त्यांना सांगितलं. त्यानंतर त्यांनी मी जातो आणि नेमकं काय चाललंय ते बघतो आणि तुम्हाला सांगतो असं सांगून गेले.

Sharad PAwar - Chagan Bhujbal
Ajit Pawar Speech : अजित पवारांनी तासाभराच्या भाषणात सगळंच उकरुन काढलं; भाषणातील ठळक मुद्दे

त्यानंतर ते परत आलेच नाही अन् तिथे जाऊन शपथच घेतली, असं शरद पवार यांनी आपल्या भाषणात सांगितलं. त्यामुळे इथून पुढे बघून येतो असं कुणी सांगितलं तर जरा जपून राहा, असा मिश्किल टोलाही शरद पवार  यांनी लगावला.

विरोध असताना तिकीट दिलं मंत्रीही केलं

याआधी छगन भुजबळांचं नाव घेता शरद पवारांनी म्हटलं की, एक नेते तुरुंगात गेले. काही वर्ष तुरुंगात राहिले. त्यानंतर काही प्रयत्नानंतर त्यांची सुटका झाली. २०१९मध्ये निवडणुका लागल्या. मला काही लोकांनी सांगितलं तुरुंगात राहिलेल्यांना निकाल लागेपर्यंत संधी देऊ नका.

मात्र त्यांच्यावर अन्याय झाल्याचं मला वाटत होतं. त्या अन्यायामुळे त्यांना आत बसावं लागलं. त्यामुळे माझ्या पक्षाच्या नेत्याला मी घरी बसवणार नाही. माझा पक्ष त्यांच्या पाठिशी उभा राहिल, अशी भूमिका मी घेतली. (Latest Marathi News)

मी त्यांना तिकीट दिलं, ते निवडून आले. सरकार आलं तेव्हा शिवाजी पार्कवर मंत्रिमंडळाच्या पहिल्या शपथविधासाठी पक्षाच्या वतीनं दोन लोकांची नावं द्यायची होती. त्यावेळी त्यांचं नाव मी पहिलं दिलं. ही भूमिका मी घेतली, असं शरद पवारांनी सांगितंल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com