Ajit Pawar Speech : अजित पवारांनी तासाभराच्या भाषणात सगळंच उकरुन काढलं; भाषणातील ठळक मुद्दे

Political News : २०१९च्या पहाटेच्या शपथविधीवर पहिल्यांदाच अजित पवारांनी उघडपणे भूमिका मांडली.
Ajit Pawar
Ajit PawarSaam TV
Published On

Ajit Pawar Speech : राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार आणि  शरद पवार पहिल्यांच आमने सामने आले. यावेळी अजित पवार यांनी आपल्या भाषणात अनेक वर्षांची खदखद बाहेर पाडली. अजित पवारांनी पहाटेचा शपथविधीपासून सारं काही उकरुन काढलं. पवार साहेबांचं वय झालं आतातरी त्यांना थांबावं. तरुणांच्या हाती कारभार द्यावा असं, अजित पवार यांनी म्हटलं.

२०१९ चा पहाटेचा शपथविधी

२०१९च्या पहाटेच्या शपथविधीवर पहिल्यांदाच अजित पवारांनी उघडपणे भूमिका मांडली. २०१९ला भाजपसोबत जायचा निर्णय पवार साहेबांनीच घेतला होता. सरकार स्थापन करण्यासाठी भाजपकडून देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीकडून मला ही जबाबदारी दिली गेली होती. सर्व चर्चा झाल्या, पाच बैठका झाल्या. मला सांगितले कुठे बोलायचं नाही. त्यानंतर जे घडलं तुम्हाला सगळं माहिती आहे.

मला विलन ठरवलं गेलं

भाजपसोबत चर्चा बंद करुन आपल्याला शिवसेनेसोबत जायचं आहे असं ठरवलं. आधी शिवसेना जातीवादी मग मित्र कसा झाला. मला लोकांसमोर विलन केलं जातं. मला कळत नाही माझी काय चूक आहे, असंही  अजित पवार यांनी म्हटलं.

२०१७मध्ये भाजपशी बोलणी झाली

भाजपसोबत जाण्यासाठी चर्चा करावी यासाठी आम्हाला पाठवलं होतं. जर भाजप सोबत जायचं नव्हतं तर पाठवलं तरी कशाला? २०१७ ला सुद्धा वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. दोन्ही बाजून बडे नेते या चर्चेला उपस्थित होते. मी कधीही महाराष्ट्राशी खोटं बोलणार नाही, खोटं बोललो तर पवारांची औलाद सांगणार नाही असे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar
Ajit Pawar Speech : भाजपसोबत चर्चेला साहेबांनीच पाठवलं, पहाटेच्या शपथविधीवर अजित पवार पहिल्यांदाच एवढं स्पष्ट बोलले

राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळून द्यायची आहे

चार पाच वेळा उपमुख्यमंत्री झालो, माझा तर रेकॉर्ड आहे. पण गाडी पुढे काही जात नाही. मला मनापासून वाटतं मी राज्याचा प्रमुख व्हावं. काही गोष्टी राबवायच्या आहेत, म्हणून प्रमुख व्हावं वाटतं. आज राष्ट्रवादी आपल्याला सगळ्यांना मिळून पुढे न्यायचं आहे. आपला राष्ट्रीय पक्ष आता राज्याचा झाला. राष्ट्रीयत्वाची मान्यता रद्द झाली. ती परत मिळवायची आहे. (Latest Marathi News)

सभांना सभेने उत्तर देणार

२०२४ ला निवडणुका होतील, त्यामध्ये २००४ मध्ये ७१ चा आकडा आहे, तो पुढे घेऊन जाणारच. महाराष्ट्र पिंजून काढू, पायाला भिंगरी बांधल्यासारखं फिरू. माझ्या दैवताला विनंती आहे, वरिष्ठांना विनंती आहे, की अजूनही विठ्ठलानं आशीर्वाद द्यावा. तुम्ही आता सभा घेणार आहात. पहिली सभा आंबेगावमध्ये. त्यांनी काय चूक केली. दिलीप वळसे पाटीलांनी काय चूक केली.पवार साहेबांनी सभा घेतली तर सभेनेच उत्तर देणार, असंही अजित पवार यांनी म्हटलं.

Ajit Pawar
Ajit Pawar On Sharad Pawar: वय झालं, तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? अजित पवारांचा शरद पवारांना सवाल

तुम्ही कधी थांबणार

शरद पवार साहेबांचं आता वय झालं आहे. 82 झालं, 83 झालं तुम्ही कधी थांबणार आहा की नाही? तुम्ही आशिर्वाद द्या ना... आम्हाला वाटतं तुम्ही शतायुषीय व्हावं, असंही अजित पवार यांनी म्हटलं.

राजीनामा मागेच घ्यायचा होता, तर दिलाच कशाला?

मला सांगितलं मी आता राजीनामा देतो आणि वेगवेगळ्या संस्था बघतो. राजीनामा दिल्यानंतर मी एक कमिटी करतो. ती कमिटी केल्यावर प्रफुल्ल पटेल, तटकरे, मी, जंयत पाटील, भुजबळ साहेब, अनिल देशमुख, धनंजय मुंडे तुम्ही सगळे प्रमुख बसा आणि सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा. आम्ही तयार झालो, तेही आम्हाला मान्य होतं. पुन्हा दोन दिवसात काय झालं माहित नाही, पुन्हा सांगितलं की मी राजीनामा मागे घेतो. मागेच घ्यायचा होता, तर दिलाच कशाला? तेही कळलं नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com