Maharashtra Political Crisis: शिवसेना, राष्ट्रवादीतील बंडात फरक काय? दोन्ही पक्षाच्या फुटीमुळे अजित पवार आणि CM शिंदेंना काय मिळालं?

Difference Between Shinde and Pawar Rebellion: एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बंडातला सारखेपणा आणि वेगळेपणा काय आहे, जाणून घेऊयात.
Maharashtra Political News
Maharashtra Political NewsSaam tv
Published On

NCP Crisis Vs Shivsena Crisis: राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या दोन वर्षात राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे . राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या बंडात नेमकं काय साम्य आणि काय फरक आहे? एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बंडातला सारखेपणा आणि वेगळेपणा काय आहे, जाणून घेऊयात. (Latest Marathi News)

शिवसेना, राष्ट्रवादीमधील आकड्यांचा खेळ

दोन्ही पक्षात फूट पडण्याआधी शिवसेनेकडे 55 आमदारांचं बहुमत होतं. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५४ आमदारांचं बहुमत होतं. एकानाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर एकनाथ शिंदेना ४० आमदारांनी पाठिंबा दिला तर १६ आमदारांनी उद्धव ठाकरेंनी समर्थन दिलं.

अजित पवार यांनी बंड केल्यानंतर ४० हून अधिक आमदारांनी पाठिंबा दिल्याचा दावा करण्यात येत आहे. तर उर्वरित आमदारांनी शरद पवार यांच्यासबोत राहणं पसंत केलंय.

Maharashtra Political News
Sharad Pawar Speech: पक्ष चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही; शरद पवारांनी ठणकावून सांगितलं

शिवसेना कुणाची? राष्ट्रवादी कुणाची?

एकनाथ शिंदे यांच्या पक्ष विरोधी हालचाली बघून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवलं. त्यानंतर व्हिप जारी केला. तर एकनाथ शिंदे यांनी बहुमताच्या जोरावर शिवसेना पक्षावर दावा ठोकला.

तर अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत राष्ट्रावादी पक्ष आम्हीच आहोत. पक्ष आमच्याच बाजूनं आहे, असा दावा केला आहे.

शिवसेना कुणाची? ही लढाई सुप्रीम कोर्टात गेली तर राष्ट्रवादी कुणाची? हे जनताच ठरवेल आम्ही जनतेच्या कोर्टात जाऊ असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

Maharashtra Political News
Sharad Pawar on Chagan Bhujbal : मी जातो, बघतो आणि तुम्हाला सांगतो, असं सांगून गेले अन् शपथच घेतली; शरद पवारांनी भुजबळांची घेतली फिरकी

शिवसेना, राष्ट्रवादी, गटबाजी वर्चस्वाची लढाई!

दोन्ही पक्षात ऐतिहासिक फूट पडली. पण दोन्ही पक्षाची लढाई ही पक्ष, चिन्ह, पक्षाचं नाव आणि पक्षाच्या कार्यलयासाठी सुरू आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मानणारा वर्ग आहे. दोन्ही नेत्यांचं त्यांच्या त्यांच्या मतदार संघात मोठं वर्चस्व आहे. दोन्ही नेत्यांची ताकद मजबूत आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी मधील बंडामुळे पक्षात नेमकं काय घडलं?

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं.तर अजित पवार यांच्या बंडामुळे शिंदे-फडणवीस सरकारचं बळ वाढलं, आणि राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली.

शिवसेना, राष्ट्रवादी मधील बंडाचं स्वरूप कसं होतं?

एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. 21 जून 2022 मध्ये त्यांनी विधानपरिषदच्या निवडणुकीनंतर सुरत गाठलं, सुरतमधून उद्धव ठाकरेंबाबतची नाराजी व्यक्त केली. त्यानंतर एकनाथ शिंदे 40 आमदारांसह गुवाहाटीला गेले. तिथून गोव्याला गेले. भाजपशासित राज्यातून प्रवास करत अखेर महाराष्ट्रात बहुमत सिद्ध करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली.

Maharashtra Political News
Sharad Pawar Speech: त्यांना माहितीये आपलं नाणं चालणार नाही; फोटोवरुन शरद पवारांचा अजित पवार गटाला टोला

तर अजित पवार यांनी कुठेही पलायन न करता थेट विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला. 2 जुलैला प्रफुल्ल पटेल आणि आमदारांसह राजभवन गाठलं. 2 जुलैच्या दुपारी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांनी 8 आमदारांसह मंत्री पदाची शपथ घेतली.

2022 मध्ये जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंड केलं तेव्हा महाराष्ट्रात मोठं सत्तानाट्य झालं. एकनाथ शिंदेंनी आमदारांसह सुरत,गुवाहाटी,गोवा आणि मग महाराष्ट्र मुंबई असं प्रवास करत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष केंद्रीत केलं.

एक वर्षभरानंतर 2023 मध्ये अजित पवार यांनी पुकारलेल्या बंडावेळी शिंदेंसारख्या कोणत्याही हालचाली झाल्या नाही. सगळ्या बैठका मुंबईत झाल्या. आमदारांची जुळवाजुळव मुंबईत झाली. आणि अजित पवारांचं बंड मुंबईत पार पडलं.

पक्षप्राप्तीसाठी लढाई!

एकनाथ शिंदेंनी यांनी शिवसेना पक्षावर केलेल्या दाव्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट अशी कायदेशीर लढाई दिली पण यासगळ्यात ठाकरेंनी सहानुभूतिपलीकडे फार काही हाती लागलं नाही.

तर शरद पवार यांनी बंडखोरांना पक्षाअतंर्गत कारवाई केली. तसेच कोर्टाच्या दारात न ठोठावता जनतेच्या दारात जाण्याची भूमिका घेतली.

बंडानंतर कटूता, घोषणा, विशेषनाम!

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिंदे आणि समर्थकांवर टीका करण्यात आल्या. गद्दार म्हणून आमदारांना संबोधलं जाऊ लागलं. 50 खोके एकदम ओकेच्या घोषणेने डिवचलं गेलं.

तर अजित पवार यांनी बंड केल्यानंतर शरद पवार यांच्याकडून अजून तरी कोणताही अपशब्द आला नाही. किंवा कोणतेही आरोप देखील करण्यात आले नाहीत. हा बंड घरातील छोट्याशा वादासारखा हाताळला जात असल्याचं बोललं जातंय.

Maharashtra Political News
Supriya Sule on Ajit Pawar: 'बापाचा नाद करायचा नाही', सुप्रिया सुळेंनी थेट अजित पवारांना ललकारलं

बंडखोरांची विचारधारा आणि विचारांची लढाई!

पक्षवाढ, हिंदुत्त्व, बाळासाहेबांच्या विचारांचा नारा देत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. तर अजित पवार यांनी वैचारिक विरोधकांशीच हातमिळवणी केली. त्यामुळेच सगळ्यांना धक्का बसला आहे.

बंडाची चाहूल?

एकनाथ शिंदे याच्या बंडावेळी फारशी चर्चा नव्हती. दबक्या आवाजातील कुजबूज वगळता कुणाला कानो कान खबरही नव्हती. तर अजित पवार काही वेगळी भूमिका घेणार याची चाहूल 2019 पासूनच सगळ्यांना होती. 2019 मध्ये २ दिवसांचं सरकारही अजितदादांनी भाजपसोबत स्थापित केलं होतं.

यानंतर देखील वारंवार अजितदादा नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आणि अखेर 2 जुलै 2023 मध्ये अजित पवार यांनी शिंदे-भाजपसोबत जाण्याची भुमिका घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणात दुसरा भुकंप झाला आहे.

बंडामुळे नेमकं काय घडलं?

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे 2019 मध्ये जन्माला आलेलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. आणि 2022 मध्ये एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अस्तिवात आलं.तर अजित पवार यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीची युती खिळखिळी झाली. शिंदे-फडणवीस सरकारला आणखी बळ मिळालं.

Maharashtra Political News
Bachchu Kadu Statement : राष्ट्रवादीसोबत आल्याने शिंदे गटातील आमदारांची गोची; बच्चू कडू यांनी बोलून दाखवली खदखद

बंडामुळे एकानाथ शिंदे-अजित पवार यांना काय मिळालं?

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे प्रथमच शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळालं. जे 2019 मध्ये थोडक्यात हुकलं होतं. तर अजित पवार यांना बंडामुळे तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपद भुषवता आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com