Supriya Sule on Ajit Pawar
Supriya Sule on Ajit PawarSaam Tv

Supriya Sule on Ajit Pawar: 'बापाचा नाद करायचा नाही', सुप्रिया सुळेंनी थेट अजित पवारांना ललकारलं

'बापाचा नाद करायचा नाही', सुप्रिया सुळेंनी थेट अजित पवारांना ललकारलं
Published on

Latest News On NCP Meeting: ''दा. सू. वैद्यांनी माझ्यासाठी एक कविता लिहिलेली होती. श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी. लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी. हा बाप माझ्या एकटीचा नाही, माझ्यापेक्षा तुमचा जास्त आहे. बापाच्या आणि आईच्या बाबतीत नाद करायचा नाही'', असं असं म्हणत राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Cm Ajit Pawar) यांनी ललकारलं आहे.

Supriya Sule on Ajit Pawar
Ajit Pawar On Sharad Pawar: वय झालं, तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? अजित पवारांचा शरद पवारांना सवाल

'आई वडिलांसोबत सर्वात आधी लेक उभी राहते'

वाय.बी. चव्हाण सेंटर राष्ट्रवादीच्या बैठकीत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ''जेव्हा घरावर जेव्हा अडचण येते तेव्हा आई वडिलांसोबत सर्वात आधी लेक उभी राहते. यातून हरुन जायचे नाही. पक्ष आहे पुन्हा बांधू. जे आहेत त्यांच्यासाठी आनंद आहे. पण आता जे गेले त्यांना शुभेच्छा आहे.''  (Latest Marathi News)

राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा म्हणजे शरद पवार

सुळे म्हणल्या की, ''शपथविधी झाल्यानंतरही लोक म्हणत होते आता काय होणार, राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला, त्यावर एकच उत्तर आलं शरद पवार.''

Supriya Sule on Ajit Pawar
Supriya Sule Today Speech: राष्ट्रवादीचा एकच शिक्का आहे, त्याचं नाव शरद पवार; सुप्रिया सुळे कडाडल्या

मोदींवर हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ''ना खाऊंगा ना खाने दुंगा बोलणाऱ्या भाजपविरोधात आता लढाई सुरु झाली आहे. कैसे तुमने खाया आज के बाद तुमको महाराष्ट्र मे खाने नही दुंगी''

त्या म्हणल्या की, आठ नऊ खुर्च्या मोकळ्या झाल्या आहेत त्यावर नवीन लोकांना संधी मिळेल. आता राष्ट्रवादीचा एकच शिक्का आणि त्याचं नाव..शरद पवार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com