Latest News On NCP Meeting: अजित पवार गटाने पक्षात सामील झाल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत . राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर अजित पवार यांनी पक्षश्रेष्ठी शरद पवार यांच्यावरच राजीनाम्यावरून टीका केली. अजित पवार यांनी आजच्या सभेत खदखद व्यक्त केली. अजित पवारांच्या टीकेला सुप्रिया सुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तसेत 'राष्ट्रवादीचा एकच शिक्का आहे, त्याचं नाव शरद पवार, अशा शब्दात सुळेंनी अजित पवार गटाला उत्तर देत ललकारलं. (Latest Marathi News)
शरद पवार गटाची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आली. या बैठकीत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'वडिलांना म्हणायचं आशीर्वाद द्या, घरी बसा, असं म्हणण्यापेक्षा आम्ही पोरी परवडल्या. वडील आजारी पडतात, तेव्हा वडिलांना मुली हॉस्पिटलला नेतात. घरावर अडचण येते, तेव्हा लेकच वडिलांसोबत उभी राहते'.
'पक्ष बंधू, जे गेलेत त्यांना शुभेच्छा, कारण २०१९ मी विसरले नाही, ते विसरले असतील. तेव्हा ८० वर्षांचा योद्धा लढला, असे सुळे म्हणाल्या.
'भाजपच्या विरोधात बोलत राहू. त्यांचा जो काही कार्यक्रम करायचा आहे, तो दिल्लीत करू. सत्ता येते जाते. सत्तेने सुख मिळत नाही. आता ८ - ९ खुर्च्या मोकळ्या झाल्यात. त्या खुर्च्यांवर नवीन लोकांना बसायची संधी मिळेल, असेही सुळे म्हणाल्या.
'शरद पवार यांना विनंती करणार आहे. या स्वतःहून ३३ टक्के आरक्षण महिलांना का देत नाही . आमच्यासारख्या काही महिला खुल्या वर्गातूनही लढतात. माझा विश्वास आहे, बाकीचे काय करतील माहीत नाही. या महाराष्ट्रातील जनता या योद्ध्याच्या बाजूने उभी राहील, असेही त्या म्हणाल्या.
'ओरिजिनल राष्ट्रवादीचा झेंडा चिन्ह ओरिजिनल पक्षाकडेच राहील. राष्ट्रवादीचा एकच शिक्का आहे, त्याचं नाव शरद पवार, अशा शब्दात सुळे या अजित पवार गटावर कडाडल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.