Sangram JAgtap Saam TV
महाराष्ट्र

Ahmednagar Crime News : गुंडागर्दीवर पोलिसांचा धाकच उरला नाही, राष्ट्र्वादीच्या आमदाराची गृहखात्यावर टीका

Crime News : अहमदनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून खून आणि मारामारीचे प्रकार वाढले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

सुशील थोरात

Ahmednagar News : अहमदनगर शहरात शनिवारी रात्री उशीरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाला. यामध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता अंकुश चत्तर हा अजूनही मृत्यूची झुंज देत आहे. एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

अहमदनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून खून आणि मारामारीचे प्रकार वाढले आहेत. त्याचप्रमाणे मंगळसूत्र चोरी आणि दिवसाढवळ्या नागरिकांना लुटण्याचे प्रकारही वाढले आहेत. अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी केला आहे.

दोन महिन्यात एक खून आणि जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याच्या गंभीर घटना आणि इतर छोट्या मोठ्या मारामाऱ्या रोजच होत आहेत. अशा गुंडांवर पोलिसांचा धाक उरला नसल्याचा आणि पोलिसांवरही कोणाचा दबाव राहिला नाही, असा आरोप संग्राम जगताप यांनी केला आहे. (Political News)

गृह खात्यावर हल्लाबोल करताना अवैद्य व्यवसायातून गुंडागर्दी पोचली जात आहे. पोलिसांचा धाक उरला नाही. याबाबत राज्यातील वरिष्ठ नेत्यांकडे समक्ष भेटून तक्रार करणार असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: भयंकर! बलात्कारप्रकरणी १४ वर्षे तरूंगावासाची शिक्षा, बाहेर आल्यानंतर दत्तक घेतलेल्या मुलीवर केला रेप

Voter List Update: राज्यात 10 महिन्यात १४ लाख नवीन मतदारांची भर|VIDEO

Maharashtra Politics: नाशिकच्या पालकमंत्रिपदावरुन कुंभ,भुजबळांची पालकमंत्रिपदासाठी फिल्डिंग

Lion Video Viral: महाराष्ट्रातील पुरात अडकला सिंह? जीव वाचवण्यासाठी सिंहाची धडपड

POCSO : अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार, पोक्सो न्यायालयाने महिलेला सुनावली २० वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT