NCP Mla Sandeep Kshirsagar Dance Video Saam TV
महाराष्ट्र

Sandeep Kshirsagar Dance : शिवजयंतीच्या मिरवणुकीत आमदार संदीप क्षीरसागरांचा भन्नाट डान्स; VIDEO तुफान व्हायरल

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा तुफान डान्स करतानाचा व्हिडिओ, सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video) झाला आहे.

विनोद जिरे

NCP Mla Sandeep Kshirsagar Dance Video : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हटलं की उत्साह येतोच. तर या उत्साहात भर अन खास मेजवानी म्हणून बीडमधील योगेशपर्व टीमने, बीडकरांसाठी सिनेअभिनेता आणि प्रसिद्ध हास्यसम्राट भाऊ कदम यांची मैफिल ठेवली होती. यावेळी खास महिलांना भाऊ कदमांसोबत गप्पा देखील मारता आल्या. (Latest Marathi News)

विशेष म्हणजे यावेळी अनेक महिलांनी भाऊ कदम यांना प्रश्न देखील केले. यामुळं महिलांसह तरुणाईला ही खास मेजवानी ठरलीय. दरम्यान यावेळी शांताबाई गाण्यावर भाऊ कदमांसह नगरसेवक योगेश क्षीरसागरांनी चांगलाचं ठेका धरला होता. यामुळं महिलांसह तरुणाईला भाऊ कदमांची चांगलीचं भुरळ पडल्याचं पाहायला मिळालं.

आमदार संदीप क्षीरसागरांचा भन्नाट डान्स

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा तुफान डान्स करतानाचा व्हिडिओ, सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video) झाला आहे. बीड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंती उत्सवात, बीड शहरातील संभाजी महाराज क्रीडा संकुलावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव संदीप क्षीरसागर यांनी देखील मनसोक्त आनंद लुटला.बीड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अनोखी शिवजयंती साजरी करण्यात आली. यात 650 ढोल वादक, युक्रेन, रशिया येथील विदेशी कलाकार, केरळ, पंजाब येथील कलाकारांच्या चित्तथरारक कसरती आणि भगवे फेटे परिधान केलेल्या हजारो महिला भगिणीसह तरुणांनी केलेली अलोट गर्दी अशा वातावरणात आमदार संदीप क्षीरसागर यांनी आयोजित केलेल्या शिवजयंती महोत्सवाची दिमाखदार सांगता झाली.

दरम्यान यावेळी बारामती अ‍ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त/सचिव तथा आ.रोहित पवार यांच्या मातोश्री सौ.सुनंदा राजेंद्र पवार, आमदार संदीप क्षीरसागर सौ.नेहाताई संदीप क्षीरसागर यांची उपस्थिती होती.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या अजय बोरस्ते यांची गटनेतेपदी निवड

ZP Election: अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, पुण्यात जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार थांबवला

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? ₹१५०० रुपयांबाबत महत्त्वाची अपडेट

Petrol-Diesel Price: 'तो' एक निर्णय सर्वसामान्यांना 'महागा'त पडणार,पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार

ZP Election: निवडणूक अन् CTET परीक्षा एकाच दिवशी; इलेक्शन ड्युटी करुन परीक्षा कशी द्यायची? शिक्षकांच्या मनात संभ्रम

SCROLL FOR NEXT