Rohit Pawar - Praniti Shinde Saam TV
महाराष्ट्र

Rohit Pawar VS Praniti Shinde : प्रणिती शिंदे यांच्या संतापानंतर रोहित पवार यांची नरमाईची भूमिका; म्हणाले...

प्रणिती शिंदे यांनी टीका केल्यानंतर रोहित पवार यांनी त्यांना सोम्य भाषेत उत्तर दिलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Rohit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. रोहित पवारांची आमदारकीची पहिली टर्म आहे, काहींमध्ये पोरकटपणा असतो, अशी टोकदार टीका प्रणिती शिंदे यांनी केल्यानंतर रोहित पवार यांनी त्यांना सोम्य भाषेत उत्तर दिलं आहे. 'प्रणिती शिंदे माझ्या मोठ्या भगिनी असून त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे, असं कार्यकर्त्यांना म्हणत आमदार रोहित पवार यांनी नरमाईची भूमिका घेतली. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला द्यावा, अशी मागणी काही दिवसांपूर्वी केली होती. रोहित पवारांच्या या मागणीला काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी कडक शब्दांत उत्तर दिलं. त्यामुळे सोलापूरच्या जागेवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरु झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.

प्रणिती शिंदे यांच्या रोहित पवारांवरील टीकेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सोशल मीडियावर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर रोहित पवार यांनी ट्विट करत कार्यकर्त्यांना नाराज न होण्याचे आवाहन केलं. तसेच रोहित पवार यांनी प्रणिती शिंदे यांना त्यांच्या विधानामागची भावना सांगितली.

रोहित पवार ट्विट करत म्हणाले, 'आमदार प्रणिती शिंदे ताईंच्या वक्तव्यावरून नाराज झालेले कार्यकर्ते आपला राग व्यक्त करतायेत,पण कुणीही नाराज होऊ नये. त्या माझ्या मोठ्या भगिनी असून त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळं आपापसात वाद न करता बेरोजगारी हा आजचा मुख्य प्रश्न सोडवण्यासाठी आपण आपली शक्ती खर्च करूया'.

'राहीला प्रश्न सोलापूरच्या जागेचा तर त्यासंदर्भात दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते निर्णय घेतील, मी कुठलाही दावा केला नव्हता, मी केवळ सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवली होती, असे रोहित पवार पुढे म्हणाले.

प्रणिती शिंदेंनी काय म्हटलं होतं?

सोलापूर लोकसभेसंदर्भात रोहित पवारांनी (Rohit Pawar) केलेल्या वक्तव्याबाबत विचारलं असता, प्रणिती शिंदे यांनी म्हटलं की, कोण रोहित पवार? म्हणत त्यांच्या वक्तव्याला किंमत न देण्याचा प्रयत्न केला. आमदारकीची त्यांची ही पहिलीच टर्म आहे. काहीजणांमध्ये पोरकटपणा असतो. काही दिवस जाऊ द्या, त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी येईल, असं प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी म्हटलं होतं.

रोहित पवार यांनी सोलापूरच्या जागेसाठी काय म्हटलं होतं?

काही दिवसांपूर्वी रोहित पवार सोलापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, सोलापूर लोकसभा निवडणूक काँग्रेस लढविणार की राष्ट्रवादी, असा प्रश्न उपस्थित झाला होता. याबाबत लवकरच महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय होईल. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा होणारा पराभव पाहून ही जागा राष्ट्रवादीला सोडावी, अशी मागणी त्यांनी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politcs : सहानभुती संपली, मविआ हारली; आघाडीच्या पराभवाची कारणे काय? वाचा स्पेशल रिपोर्ट

Nawab Malik News : मानखुर्दमध्ये नवाब मलिक यांचा पराभव | Marathi News

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नव्या सरकारचा शपथविधी हा वानखेडे स्टेडियमवर होणार

Sujay Vikhe Patil : जिल्ह्यात सत्तेचा माज करणाऱ्यांचा कार्यक्रम लावला; संगमनेरमधील विजयानंतर सुजय विखे यांचा थोरातांवर निशाणा

Maharashtra Assembly Election Result: तुमचा आमदार कोण? २८८ मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी पाहा

SCROLL FOR NEXT