Gopinath Munde  Facebook
महाराष्ट्र

'२०१४ चे खरे मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे होते'

गोपीनाथ मुंडे आज असते तर राजकारणाची पातळी इतक्या खालच्या पातळीवर गेली नसती, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे.

सचिन आगरवाल

अहमदनगर : २०१४ चे खरे मुख्यमंत्री कोण होते, तर ते गोपीनाथ मुंडे होते. दुर्दैवाने ते आपल्यात नाहीत. जर आज असते तर राजकारणाची पातळी इतक्या खालच्या पातळीवर गेली नसती, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अहमदनगर येथे केलं आहे. आज दिवंगत गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात रोहत पवार बोलत होते. ( Rohit Pawar Latest News In Marathi )

हे देखील पाहा -

आज दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची ८ वी पुण्यतिथी आहे. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात आमदार रोहित पवारांनी गोपीनाथ मुंडे यांच्यावर भाष्य केलं. रोहित पवार म्हणाले, '२०१४ चे खरे मुख्यमंत्री कोण होते, तर गोपीनाथ मुंडे साहेब होते. दुर्दैवाने ते आपल्यात नाहीत. ते जर आज असते तर राजकारणाची पातळी इतक्या खालच्या पातळीवर गेली नसती. ते हयात असते तर राजकारणाची पातळी वर असती. विरोध झाला असता तर सर्वच राजकीय पक्षांमध्ये वाद झाला असता. पातळी आणि संस्कृती सोडून कोणी बोललं नसतं'.

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी गोपीनाथ मुंडेंवर केलेल्या वक्तव्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. 'हयात नसलेल्या व्यक्तीबद्दल बोलून वाद सुरू करणं महत्त्वाचं नाही. पवार कुटुंबीयातील कोण मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आहे हे पहिलं रोहित पवार यांनी जाहीर करावं. मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीसाठी अजित पवार की सुप्रिया सुळे उमेदवार आहेत. रोहित पवार यांच्या मनात कुठल्या कोपऱ्यात मुख्यमंत्री पदाची ओढ आहे. घरातला एक उमेदवार निश्चित करा आणि मग आमच्या हयात नसलेल्या मुंडेसाहेबांविषयी बोला, असं प्रवीण दरेकर म्हणाले. 'हयात नसलेल्या व्यक्तींचा वापर करून वाद निर्माण करायला रोहित पवार अजून लहान आहेत, असा टोलाही दरेकरांनी रोहित पवारांना लगावला.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chutney Recipe : दोडक्याची भाजी नको? मग एकदा 'ही' चटपटीत चटणी करून पाहाच, लहान मुलंही पुन्हा पुन्हा मागतील

Maharashtra News Live Update: पावसाने फिरवली पाठ! बुलढाणा जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघा 26 टक्के जलसाठा

EPFO Pension Rules: PF काढताना किती TDS कापला जातो? प्रत्येक कर्मचाऱ्याने जाणून घ्यावेत हे नियम

Mutual Funds: बँक, म्युच्युअल फंड आणि विमा... यापुढे सर्वांसाठी लागणार एकच ओळखपत्र

रोज वापरण्यासाठी १ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स

SCROLL FOR NEXT