जळगाव : 'सद्यस्थितीत गणेशोत्सव सुरू आहे. बाप्पा हा बुद्धीचा देवता आहे. त्यामुळे या बुद्धीच्या देवतेला मी विनंती करतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना बुद्धी दे आणि मंत्रिमंडळाचा लवकर विस्तार कर तसेच प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री नियुक्त कर...' असं साकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी गणपती बाप्पाकडे घातलं.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा 2 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त जळगाव येथील निवासस्थानी एकनाथ खडसे यांचे ढोल ताशांच्या गजरात जल्लोशात स्वागत करण्यात आले. स्वागत सत्कारानंतर एकनाथ खडसे पत्रकारांशी बोलत होते. (Eknath Khadse Todays News)
'सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे शिंदे सरकारमध्ये साशंकता'
सुप्रीम कोर्टाचा निकाल येण बाकी आहे. या निकालाबाबत शिंदे सरकारमध्ये साशंकता असावी, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्तार लांबवला. तसेच पालकमंत्र्यांच्या सुद्धा नियुक्त्या लांबविल्या असाव्यात, असा टोलाही एकनाथ खडसे यांनी लगावला.
शेतकऱ्याला समाधानी कर, अशी बाप्पाकडे प्रार्थना
राज्यातील शेतकऱ्यांवर अतिवृष्टीच संकट कोसळल आहे. या संकटातून शेतकऱ्यांना मुक्त कर, देशावर जे महागाई संकट आहे, जगभरावर जे अनुवस्त्र युद्धाचं जे संकट आहे, ते बाप्पाने दूर करावं, विविध संकटातून देशाला राज्याला जगाला दूर करावं, शेतकऱ्याला समाधानी कर, अशी प्रार्थना बाप्पाकडे केली असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले. (Eknath Khadse vs Eknath Shinde)
'नुसत्याच घोषणा, सरकारने लवकरात लवकर मदत करावी'
सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा केली आहे, ती मदत अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना अतिवृष्टीग्रस्तांना सरकारने लवकरात लवकर मदत करावी, अशी विनंती सरकारला करणार असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले.
मुख्यमंत्री होताच एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना तातडीने मदतीची घोषणा केली. मात्र त्या घोषणेच काय झालं, अशा अनेक घोषणा केल्या, मात्र अद्याप तरी त्याचे प्रशासकीय आदेश निघालेले नाहीत अथवा गोष्टीची अंमलबजावणी झालेली नाही, असं म्हणत एकनाथ खडसेंचा शिंदे सरकारवर निशाणा साधला.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.