Maharashtra Politics : भाजप उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत; अमित शाहांचा प्लॅन ठरला!

येत्या ५ सप्टेंबर रोजी अमित शाह मुंबई दौऱ्यावर येतील.
Uddhav Thackeray Amit Shah Mumbai News
Uddhav Thackeray Amit Shah Mumbai News Saam Tv

BJP vs Shivsena News : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) हे लवकरच मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. येत्या ५ सप्टेंबर रोजी शाह मुंबई दौऱ्यावर येतील. या दौऱ्यात ते मुंबईतील लालबागचा राजा सिद्धिविनायक या प्रमुख गणपतीचे दर्शन घेतील. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या गणपतीचे दर्शन घेणार आहेत. (Amit Shah Todays News)

Uddhav Thackeray Amit Shah Mumbai News
Mumbai News : दारूच्या नशेत पोलिसांना मारहाण; नेव्ही, CISF जवानांसह चौघांना अटक

विशेष म्हणजे, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह हे मुंबईत भाजप नेत्यांची बैठक घेणार असल्याची माहिती आहे. गेल्या पंचवीस वर्षापासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे ही सत्ता काबीज करण्यासाठी यंदा भाजप विशेष मेहनत घेत आहे. त्याच दृष्टीने अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने मिशन मुंबई महापालिकेचा शुभारंभ होईल.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दरवर्षी लालबागच्या दर्शनाला येतात. यावर्षी सुद्धा शाह हे मुंबईत येऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या गणपतीचे दर्शन घेणार आहेत. (Uddhav Thaackeray Todays News)

Uddhav Thackeray Amit Shah Mumbai News
Dance Video : 'काला चश्मा' गाण्यावर थिरकल्या विदेशी तरुणी; पाहा जबरदस्त VIDEO

दरम्यान, गेल्या दोन वर्षांमध्ये कोविडमुळे अमित शाह यांना लालबागच्या राजाचे दर्शन घेता आले नव्हते. मात्र, यंदा गणेशोत्सवावर कोणतेही निर्बंध नसल्याने अमित शाह मुंबई दौऱ्यावर येऊन लालबागच्या राजाचे दर्शन घेणार आहेत. याचबरोबर मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी अमित शहा भाजपच्या पदाधिकाऱ्यांना कानमंत्रही देणार असल्याची माहिती आहे.

आशिष शेलारांकडे महत्वाची जबाबदारी

दरम्यान, मुंबई महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने आशिष शेलारांकडे पुन्हा मुंबईची जबाबदारी दिली आहे. आशिष शेलार हे मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष आहेत. मुंबई महापालिकेच्या दृष्टीने रणनीती आखण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असेल.'मुंबईवरील एका कुटुंबाची मक्तेदारी संपली पाहिजे. आमचे 200 + नगरसेवक निवडून येतील आणि आमचे 45+ खासदार निवडून येतील.' असा दावा आशिष शेलार यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com