eknath khadse and girish mahajan Saam tv
महाराष्ट्र

Eknath Khadse : 'कुणाचे बोट धरून, पाय चाटून मोठा झालो नाही'; एकनाथ खडसेंची गिरीश महाजनांवर जहरी टीका

राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केली आहे.

संजय महाजन

Eknath Shinde News : राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या जोरदार टीका केली आहे. 'मी कुणाचे पाय धरून किंवा बोट धरून पाय चाटून मोठा झालेलो नाही. कुणाच्या मागे उभा राहून टिव्हीवर माझ चित्रं आलं पाहिजे, अशा स्वरूपाचं काम मी कधीही केलेलं नाही, अशी जहरी टीका राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केली आहे. (Latest Marathi News)

जळगाव (Jalgaon) जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीत आता प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप आमनेसामने आले आहेत. याचदरम्यान, गिरीश महाजन यांनी आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावर जोरदार टीका केली होती. गिरीश महाजन यांनी खडसेंना उद्देशून खडसेंनी आता प्रचार थांबवला पाहिजे, आराम केला पाहिजे, अशी टीका केली होती.

त्यानंतर एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर घणाघाती टीका करत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'गिरीश महाजन यांना आता माझी भीती वाटायला लागली आहे. म्हणून ते माझा प्रचार थांबवा म्हणत आहेत. मी मरेपर्यंत राजकारणी राहणार आहे. जोपर्यंत माझा आवाज बुलंद आहे, तोपर्यंत मी राजकारणात सहभागी राहणार आहे. मी थकणारा नाही. जनतेचे प्रश्न घेऊन मी संघर्ष करणार आहे, लढणार आहे'.

'मी कुणाचे पाय धरून, बोट धरून किंवा पाय चाटून मोठा झालेलो नाही. कुणाच्या मागे उभा राहून टिव्हीवर माझं चित्र आलं पाहिजे, अशा स्वरूपाचं मी कधीही केलेलं नाही. मी कुणाच्या मागे राहिलेलो नाही. लोक माझ्या मागे उभे राहिले आहेत. ते टिव्हीवर झळकले, अशीही टीका खडसे यांनी केली.

'मी लाचार नाही. विश्वासाने जगणारा माणूस आहे. यांच्या वडिलांना म्हातारपण आलं नाही का? यांना म्हातारपण येणार नाही का? , असं म्हणत खडसेंनी गिरीश महाजन यांना टोले लगावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tomato Shave Bhaji Recipe : एक टोमॅटो अन् वाटीभर शेव, रात्रीच्या जेवणाला झटपट बनवा 'हा' पदार्थ

Ashadh Wari: विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेल्या वारकऱ्याला अमानुष मारहाण, पंढरपुरात सुरक्षा रक्षकांची मुजोरी|VIDEO

Language Row : मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा काढणाऱ्या व्यापाऱ्यांची दिलगिरी; मराठी अस्मिता मोर्चाआधीच निर्णय

Amravati News: अमरावतीत बॉम्बची अफवा, 'या' परिसरात शोधमोहीम सुरू, पोलिसांचा मोठा फौजफाटा|VIDEO

Salt Scrub : मीठाचे पाणी त्वचेसाठी चांगले आहे का?

SCROLL FOR NEXT