Sharad Pawar : सीमावादावरून काल अल्टिमेटम, आज थेट सीमाभागात फोन; शरद पवार स्वतःच मैदानात उतरले

सीमा भागात तणाव वाढत असल्याने राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते प्रकाश मरगाळे यांना फोन करून सीमा भागात सद्य परिस्थितीची माहिती घेतली.
Sharad Pawar News in Marathi
Sharad Pawar News in Marathi Saam TV
Published On

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात चिघळलेली परिस्थिती पाहता राज्यातील सर्वच पक्षाचे नेते अॅक्टिव्ह झाले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील काल पत्रकार परिषद घेत कर्नाटक सरकारला अल्टिमेटम दिला आहे. सीमा भागातील संघर्ष थांबला नाहीतर मला स्वत: सीमाभागात जावं लागेल, असं शरद पवार यांनी म्हटलं. आज शरद पवार यांनी सीमा भागातील परिस्थितीचा तेथील नेत्यांना फोन करुन आढावा घेतला. (Maharashtra-Karnataka Border Dispute)

सीमा भागात तणाव वाढत असल्याने राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते प्रकाश मरगाळे यांना फोन करून सीमा भागात सद्य परिस्थितीची माहिती घेतली. तसेच आपण सीमावासियांसोबत नेहमीच उभे आहोत, असं आश्वासन त्यांनी सीमा भागातील नागरिकांना दिलं. संसदेत सीमावासियांवर कर्नाटक सरकारकडून होत असलेल्या अत्याचाराबाबत प्रश्न उपस्थित केले असल्याची माहितीही शरद पवार यांनी सीमावासियांना दिली.

Sharad Pawar News in Marathi
तुमच्यात दम असेल तर इथे या, नाहीतर आम्ही तिथे येतो; कन्नड रक्षण वेदिकेचं थेट शिंदे सरकारला चँलेंज

प्रकाश मरगाळे यांनी म्हटलं की, शरद पवार गेले सात-आठ दिवसांपासून सीमा भागातील नागरिकांशी संपर्कात होते. सातत्याने ते येथील परिस्थितीचा आढावा घेत होते. त्यानुसार एकूण परिस्थिती पाहता त्यांनी काल पत्रकार परिषद घेत सीमावासियांना आधार दिला.

सीमा भागातील चिघळलेल्या परिस्थितीवरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज संसदेत आवाज उठवला. आमच्या समस्या केंद्रापुढे मांडण्यासाठी शरद पवारांसारखा मोठा नेता आमच्या पाठिशी आहे. तुम्हाला कुठलीही अडचण येऊ देणार नाही. तुम्हाला लागेल ती मदत करण्याचा प्रयत्न करेल असा शब्दही शरद पवारांनी दिला आहे, अस मरगाळे यांनी सांगितलं.

Sharad Pawar News in Marathi
रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं, मग.., सीमाप्रश्नावरून रोहित पवारांची CM शिंदेंवर टीका

एन डी पाटलांना आमच्या मागे उभे राहणारे पवार साहेब आहे. आम्हाला काल दिलेला शब्द पाळण्यासाठी दिल्लीत सीमावासीयांच्या समस्या मांडण्याच्या सूचना शरद पवारांना दिल्याचं, प्रकाश मरगाळे यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com