Devendra Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

"ज्युनिअर मंत्र्याच्या हाताखाली देवेंद्र फडणवीस काम करतील, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं"

आमदार एकनाथ खडसे यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदासाठी आज ३० जूनला शपथ घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या. विधान परिषदेचे राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath khadse) यांनीही माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस हे आपल्या ज्युनिअर मंत्र्याच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, असं विधान करत खडसे यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.

एकनाथ खडसे यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल दोघांनाही माझ्या शुभेच्छा. फडणवीसांनी मागील सरकारपेक्षा आता अधिक चांगलं काम करावं आणि महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करावी. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्याची खूप मोठी अपेक्षा पूर्ण झाली नाही. परिस्थितीनुसार त्यांनी स्वीकारलं. महाराष्ट्रात घडलेलं नाट्य हे अनपेक्षित आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणाला गेल्या काही दिवसांपासून वेगळं वळण लागलं होतं. एकनाथ शिंदे गट आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जोरदार सत्तासंघर्ष सुरु होता. मात्र,उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे गटाची सत्ता येईल, हे जवळपास निश्चितच झालं होतं. याच पार्श्वभूमीवर अखेर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदासाठीस शपथ घेतली.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! अभिनेत्रीच्या गाडीवर हल्ला; हिरोईनची झलक पाहण्यासाठी जमावाने फोडल्या कारच्या काचा

ज्वारी, बाजरी की नाचणी; डायबिटीज असणाऱ्यांनी कोणती भाकरी खावी?

Maharashtra News Live Update: गडचिरोली - पोटेगावकडे जाणारी ST बस उलटली, 20 ते 25 प्रवासी जखमी

लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी पुण्याच्या तरुणाचा मृत्यू

By-Election: पोटनिवडणुकीत नाट्यमय घडामोडी! टीएमसीच्या उमेदवाराचा यु-टर्न आधी 'नो नंतर हो'; मनधरणीनंतर थोपटले दंड

SCROLL FOR NEXT