NCP MLA Disqualification Result Saam Digital
महाराष्ट्र

NCP MLA Disqualification Result : राष्ट्रवादी आमदार अपात्रता निकालानंतर जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रिया

NCP MLA Disqualification Result Update: राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता निकाल आणि मूळ राष्ट्रवादी कोणाची यावर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. संपूर्ण निकाल अजित पवार गटाच्या बाजूने लागल्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

Sandeep Gawade

NCP MLA Disqualification Result

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता निकाल आणि मूळ राष्ट्रवादी कोणाची यावर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. संपूर्ण निकाल अजित पवार गटाच्या बाजूने लागल्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान या निकालानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर आगपाखड केली आहे. कायद्याची पायमल्ली कशी करावी आणि सोयीनुसार निकाल कसा द्यावा याबाबत ट्युशन विधानसभा अध्यक्ष नार्वेकर देऊ शकता, अशी टीका त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 2019 वाद सुरू झाला असं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. 1 सप्टेंबर 2022 रोजी शरद पवार यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. मात्र विधिमंडळ बहुमताबाबत सुभाष देसाई केसचा सोयीनुसार वापर करण्यात आला. जर अपात्रता सुनावणी सुरू असताना विधिमंडळ चाचणी घेता येणार नाही. शेड्युल 10 कडे मी सुक्ष्म दृष्टीने बघतो. शिस्त लावण्यासाठी शेड्युल 10 चा वापर करता येणार नाही असं अध्यक्ष म्हणाले. आयाराम गयाराम यांना रोखण्यासाठी शेड्युल 10 आहे. शेड्युल 10 माझ्याकडे येतच नाही असं अध्यक्ष आता सांगतात, मग दीड वर्ष हे काय करत होते असा सवाल आव्हाड यांनी केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

30 जूनला झालेली अध्यक्षपदी निवड ही असंवैधानिक आहे असं निवडणूक आयोगाने सांगितलं. मात्र समृद्धी महामार्गाचा ब्रिज तुटला तेव्हा अजित पवार यांना विचारलं तुमचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण? तेव्हा त्यांनी म्हटलं की तुम्हाला माहिती नाही का?शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. एवढं सगळं यांना दिसलं नाही. आमची आमदारकी रद्द झाली नसली तरी थिल्लरपणा सुरू आहे. पक्षांतर म्हणजे काय? याचा वेगळा क्लास आता अध्यक्षांकडून घ्यावा लागेल, अशी टीका त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यात उष्णतेचा कहर, विदर्भात तापमान ४५ पेक्षा जास्त

AAP: 'न्याय मिळण्याची अपेक्षा संपली'; केजरीवालांचा न्यायाधीशांच्या निष्पक्षतेवरच सवाल

यंदा उष्माघातानं लाखो बळी जाणार? जगावर पुन्हा 'सुपर एल निनो'चं संकट?

Investment Scheme:भरघोस रिटर्न्ससाठी सरकारची नवी योजना? 22 हजार गुंतवा, साडेतीन लाख कमवा?

IPL 2026 मधील सर्वात जबरदस्त सामना; अवघ्या ३९ चेंडूंत RCBने मिळवला विजय,पॉईंट्स टेबल बेंगरुळुची भरारी

SCROLL FOR NEXT