Amol Mitkari On Hindi Language Compulsory Decision 
महाराष्ट्र

Amol Mitikari: गुजरातीच्या मुद्द्यावर गुजराती समाज एकत्र होतो, मग मराठीच्या मुद्द्यावर सर्वांनी एकत्र यायला काय हरकत? राष्ट्रवादीच्या आमदाराचा सवाल

Amol Mitkari On Hindi Language Compulsory Decision: संविधानाने प्रत्येकाला संवैधानिक पद्धतीने मोर्चा काढण्याचा अधिकार दिला असल्याचंही अमोल मिटकरी म्हणालेत. मराठीच्या मुद्द्यावर जर गैरराजकीय मोर्चा निघत असेल तर आमच्या पक्षालाही त्यामध्ये सहभागी होण्यास हरकत नाही असंही मिटकरी म्हणालेत.

Bharat Jadhav

पहिली इयत्तेपासून हिंदी भाषा सक्ती करण्यावरून राज्यात वातावरण तापलंय. सरकारच्या या निर्णयावर मित्रपक्षातील नेते नाराज असल्याची चित्र आहे. राष्ट्रवादीचे आमदारही मनसे आणि उद्धव ठाकरेच्या मोर्चेत सहभागी होण्याची शक्यता आहे.

मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून सर्वांनी एकत्र यायला पाहिजे,असं विधान अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी केलंय. गुजरातीच्या मुद्द्यावर गुजराती समाज एकत्र येत असेल तर मराठीच्या मुद्द्यावर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं विधान मिटकरींनी केलंय. त्यामुळे सरकारच्या अडचणी वाढणार असल्याचं म्हटलं जात आहे. (Amol Mitkari Urges Unity on Marathi Identity Issue)

पहिलीच्या वर्गापासून हिंदी भाषा शिकवण्याच्या निर्णयाला विरोध केला जात आहे. विरोधीपक्षांनी एकमुठ बांधत निर्णयाविरोधात आंदोलन उभारण्यास सुरुवात केलीय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेत निर्णयाविरोधात ६ जुलैला मोर्चा काढण्याची घोषणा केलीय. त्याचबरोबर त्यांचे बंधू उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सरकारला इशारा देत महायुती सरकारच्या निर्णयाविरोधात आंदोलन उभारण्याची घोषणा केलीय.

हिंदी भाषा सक्ती विरोधात राज्यात रान उठलंय. त्या मुद्द्यावरून राज आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आले आहेत. दोघांनी सरकारला इशारा देत निर्णयाविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. दोन्ही ठाकरे बंधुंच्या मोर्चाला महायुतीमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांचा पाठिंबा मिळत आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही आंदोलनात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केलीय. मराठी भाषा अभिमान, मराठी अस्मितेसाठी आपणही त्या आंदोलनात सहभागी होऊ, असं मिटकरी म्हणालेत.

पुढे बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असेल तर त्याचा स्वागत केल पाहिजे. दोन्ही ठाकरे बंधुंनी मराठीच्या मुद्द्यावर वेगवेगळे मोर्चे काढल्यापेक्षा एकत्र मोर्चा काढावा, अशी अपेक्षाही आमदार मिटकरी यांनी व्यक्त केलीय. जर गुजरातीच्या मुद्द्यावर सर्व गुजराती समाज एकत्र होत असेल तर मराठीच्या मुद्द्यावर सर्वांनी एकत्र व्हायला काय हरकत आहे ? असा सवालही त्यांनी केलाय.

संविधानाने प्रत्येकाला संवैधानिक पद्धतीने मोर्चा काढण्याचा अधिकार दिला असल्याचंही ते म्हटलंय. मराठीच्या मुद्द्यावर जर गैरराजकीय मोर्चा निघत असेल तर आमच्या पक्षालाही त्यामध्ये सहभागी होण्यास हरकत नसल्याचं मिटकरी म्हणालेत. त्याचवेळी अमोल मिटकरी यांनी सरकारच्या निर्णयाची पाठराखण केलीय. मराठीचा मुद्दा हाताळण्यात सरकार कमी पडले का असा, प्रश्न पत्रकारांनी अमोल मिटकरींना विचारलं होता.

त्यावर उत्तर देताना मिटकरी म्हणाले, मराठी भाषेवर अन्याय होईल असं जीआर नाहीये. आपण जीआर पाहिला तर आपल्याला समजेल की, हिंदी विषय ऐच्छिक आहे. जर २० विद्यार्थ्यांनी इतर भाषा शिकण्याची इच्छा व्यक्त केली तर दुसरी भाषा शिकवली जाईल. त्यामुळे मराठी भाषेवर अन्याय होण्यासारखा जीआर नाहीये.

पण सध्या मराठी मनाचा कल पाहिला तर असं लक्षात येईल की, प्रत्येक शाळेत मराठी भाषा शिकवली गेली पाहिजे. पण स्वत: दादाजी भुसे हे कट्टर शिवसैनिक आहेत. तेच शालेय शिक्षणमंत्री आहेत, त्यांना मराठी भाषेचं महत्त्व आणि मराठी भाषेची अस्मिता माहिती आहे. पण त्यामुळे सरकार कमी पडलं नाहीये. पण राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत, त्यासाठी तर हे आंदोलन केलं जात नाहीये ना हे पाहणं गरजेचं आहे, असं मिटकरी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Haunted Village: एक 'असे' झपाटलेले गाव जेथे जाण्यासाठी लोक घाबरतात, गिनीज बुक रेकॉर्डमध्येही याची नोंद

Indian Cricketers: भारताचे टॉप ५ महान क्रिकेटपटू कोण? शास्त्रींच्या यादीत विराट कोहली; वर्ल्डकप विजेत्या रोहित शर्माला वगळलं

Heart Health: पेनकिलर, अँटीबायोटिक्स खाण्याची सवय आहे? 'ही' औषधे घेतल्याने हृदयावर होतो परिणाम

Maharashtra Live News Update: निवासी आश्रम शाळेतील 8 वर्षाच्या मुलाची हत्या,जालन्यात खळबळ

Pankaj Deshmukh Death Case: आमदार कुटेंच्या कार चालकाचा संशयस्पद मृत्यू प्रकरण; भाजप कार्यकर्त्यांकडून देशमुख कुटुंबियांनी धमक्या

SCROLL FOR NEXT