jitendra awhad criticizes raj Thackeray  Saam Tv
महाराष्ट्र

इतिहास पोखरून आगी लावण्याचं काम करू नये; जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पुण्यातील मनसेच्या सभेनंतर राज ठाकरे यांच्यावर पलटवार केलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज पुण्यात सभा पार पडली. यावेळी नदीपात्राच्या सभेविषयी स्पष्टीकरण देताना राज यांनी नाव न घेता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना टोला लगावला. एकूणच सध्याचं हवामान पाहता कोणत्याही वेळी पाऊस पडेल, असे चिन्ह आहे. मी म्हटलं निवडणुका नाहीत, उगाच कशाला भिजत भाषण करायचं, असं म्हणत राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या पवार यांच्यावर टीका केली. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राज यांच्यावर पलटवार केलाय. एवढे दिवस सभा घेताना काय पाऊस वाटत होतं का ? शिवाजी पार्कात सभा घेतली तेव्हा काय छत्री घेऊन उभे होते का ? अफजल खान, औरंगजेब, भोंगा ह्यापेक्षा पेट्रोल-डिझेल गॅसची वाढलेली किमंत, बेरोजगार झालेली तरुण पोरं, त्याच्यावरती बोलूयात. 300 ते 350 वर्ष जुना इतिहास पोखरून निष्कारण आगी लावण्याचा काम करू नये, असा हल्लाबोल आव्हाड यांनी राज ठाकरेंवर केला आहे.

माध्यमांशी बोलताना आव्हाड पुढे म्हणाले, राज ठाकरे यांच्या भाषणालाच काही अर्थ उरलेला नाही, त्यात काही मटेरियल नाही आहे. बोलायचं म्हणून बोलतात, लोकं ऐकायला जातात, कॉमेडी शो प्रत्येकालाच आवडतो. अशा शब्दांत आव्हाड यांनी राज यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. दरम्यान, अयोध्या दौऱ्याविषयी बोलताना राज यांच्यावर टीका करत आव्हाड म्हणाले, कुणी सापळा रचला ? कमी काय केलं, हे त्यांचं त्यांना माहीत.आम्हाला त्या वादात पडायचं नाही. तुम्ही अयोध्या ला जा, नका जाऊ, तुम्ही कुठे जाता. काय करता याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. तुमच्या भोंग्यांचा राजकारण झालं.मला अभिमान आहे, महाराष्ट्र धर्म जागा झाला आणि त्यांनी ओळखले की हे फक्त दंगली घडविण्यासाठी करतायत. 3 तारखेला काहीही झालं नाही. पण तुमच्या त्या एका कृत्यामुळे महाराष्ट्रातील हिंदू धर्माच्या तमाम काकड आरत्या बंद झाल्या. असंही आव्हाड म्हणाले.

रात्रीची कीर्तन प्रवचन बंद झाली. तुम्ही मारायला गेले, कोण मेले ? याचा जरा विचार करा. मला अभिमान वाटतो या महाराष्ट्राच्या मातीचा की या मातीमध्ये जो धर्म आहे तो जागा झाला आणि तो यांच्या जाळ्यात फसला नाही. अफजल खान, औरंगजेब, भोंगा ह्यापेक्षा महत्वाचे पेट्रोल डिझेल गॅसची वाढलेली किमंत, बेरोजगार झालेली तरुण पोरं त्याच्यावरती बोलूयात. 300 वर्ष 350 वर्ष जुना इतिहास पोखरून निष्कारण आगी लावण्याचा काम करू नये. असं म्हणत आव्हाडांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज रविवारी पुण्यात सभा पार पडली. आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची आजची सभा अत्यंत महत्वाची होती. दरम्यान, अयोध्या दौरा रद्द केल्याची घोषणा राज यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यामुळे दौरा रद्द करण्याचं नेमक कारण काय ? असा सवाल उपस्थित झाला होता. यावरही राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांचा खरपूस समाचार घेतला.

Edited by - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

SCROLL FOR NEXT