Raj Thackeray: राज ठाकरेंच्या भाषणातील १० ठळक मुद्दे...

राज ठाकरेंनी कोणत्या विषयावर बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होतो.
Raj Thackeray
Raj ThackeraySaam Tv
Published On

प्रविण ढमाले

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज पुण्यात सभा होत आहे. गुढीपाडव्याची सभा त्यानंतर ठाण्यातील उत्तर सभा, औरंगाबादमधिल सभा झाल्यांनतर आज राज ठाकरे पुण्यामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करत. राज ठाकरे कोणत्या विषयावरती बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मागच्या अनेक दिवसात राज ठाकरेंवरती अनेकांनी टीका केली होती. सबंध महाराष्ट्रतून मनसैनिक पुण्यात आले आहेत. यावेळी राज ठाकरेंनी कोणत्या विषयावर बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होतो. राज ठाकरे कोणत्या प्रमुख १० मुद्द्यांवर बोलले हे आपण जाणून घेवूयात.

* अंध मनसैनिक मंचावर

राज ठाकरेंनी भाषणाला सुरुवात करण्याअगोदर सभेला आलेल्या अंध विद्यार्थांना मंचावर बोलवून त्यांना पहिल्या रांगेत बसण्याची परवानगी देवून राज ठाकरेंनी सर्वांची मने जिंकली आहेत.

* अयोध्या दौरा

राज ठाकरे म्हणाले की अयोध्या ट्रॅप आहे हे माझ्या लक्षात आलं. कारसेवकांना ठार मारले गेलं होतं. कार सेवकांच्या त्या ठिकाणाचं दर्शन घ्यायचं होतं. मी अट्टाहास करुन गेलो असतो तर तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या, तुम्हांला जेल मध्ये सडवलं गेलं असतं.

Raj Thackeray
Raj Thackeray: मातोश्री काय मशिद आहे का? राज ठाकरेंचा राणा दाम्पत्याला टोला

* राणा दाम्पत्य

राज ठाकरेंनी यावेळी राणा दाम्पत्यावरती टीका केली आहे. मी मशिदीसमोर जाऊन हनुमान चालीसा वाजवा असे सांगितले होते. परंतु राणा दाम्पत्याने मातोश्री समोर जाऊन हनुमान चालीसा वाचायचे ठरवले होते, आता मातोश्री काय मशिद आहे का? असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे.

* शरद पवार

राज ठाकरे यांनी नाव न घेता शरद पवार यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, आपल्या सभेला हॉल वगैरे परवडत नाही. पण मी पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं एसपी कॉलेज बघा मात्र त्यांनी नकार दिला. ते म्हणाले की हल्ली आम्ही कुणालाच देत नाही. आता आम्हाला नाही तर कुणालाच नाही. नदीपात्राचा विषय झाला. पण एकूणच सध्याचं हवामान पाहाता कोणत्याही वेळी पाऊस पडेल अशी चिन्ह आहे. मी म्हटलं निवडणुका नाहीत, उगाच कशाला भिजत भाषण करायचं, असं म्हणत भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठकरे यांनी शरद पवारांना टोला लगावला.

Raj Thackeray
उद्धव ठकरेंच्या अंगावर एक तरी केस आहे का?; राज ठाकरेंचा सवाल

* उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांची सभा झाली. काय पोरकटपणा चालू आहे मला कळतच नाही. आमचं खरं हिंदुत्व, यांचं खोटं हिंदुत्व. वॉशिंग पावडर विकताय का तुम्ही? तुम्हारी कमीज हमारी कमीजसे सफेद कैसे? प्रश्न रिझल्ट्सचा आहे. जो आम्ही देतो.

* मोदींना विनंती

राज ठाकरे म्हणाले की, पंतप्रधानांना विनंती आहे की लवकरात लवकर समान नागरी कायदा आणावा. देशाच्या लोकसंख्या नियंत्रणासाठी अजून एक कायदा आणावा आणि तिसरी विनंती म्हणजे औरंगाबादचं लवकरात लवकर संभाजी नगर हे नाव बदलून टाका अशी विनंती केली आहे.

Raj Thackeray
निवडणुका नाहीत, उगीच कशाला भिजत भाषण करा राज ठाकरेंचा रोख कोणाकडे?

* AIMIM

राज ठाकरेंनी यावेळी MIM चे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांच्या औरंगाबाद दौऱ्यावर टीका केली आहे. जो औरंगजेब आपल्या छत्रपतींना मारायला आला होता त्या औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेत आहेत. कोण आहेत या औलादी असा सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे.

"माझ्या सर्व आंदोलनाला यश'

मी जेवढी आंदोलने केली तेवढ्या सगळ्या आंदोलनांना यश आले आहेत. रेल्वे भरतीवेळी केलेली आंदोलनाही यश आले आहे. त्यावेळीपासूनच रल्वेची भरती त्या त्या राज्यातील भाषेत होत आहे. टोल नाक्यांच्या आंदोलनाही यश आले आहे. मी ज्यावेळी आंदोलने केली त्यावेळी पासूनच ६० ते ७० टोल नाके बंद केली आहेत, अंसही राज ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्यावर एकतरी आंदोलनाची केस आहे का हे त्यांनी अगोदर सांगावे, असा सवाल राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला.

Raj Thackeray
उद्धव ठकरेंच्या अंगावर एक तरी केस आहे का?; राज ठाकरेंचा सवाल

'भोंग्याचे आंदोलन सुरुच ठेवा'

मागच्या काही काळात राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरुन मनसे कार्यकर्त्यांची धरपकड झाली होती. त्याचबरोबर राज ठाकरेंनी नियोजीत अयोध्या दौराही रद्द केला आहे. मशिदीवरील भोंग्यांसदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यभरातील अनेक मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता. राज ठाकरेंनी भोंग्यांचे आंदोलन सुरु ठेवण्यास सांगितले आहे. येत्या तीन-चार दिवसात राज्यातील सर्वांना एक पत्र देणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

"बाळासाहेबांचे महत्त्व कमी करताय"

तुमच्या सोयीसाठी कशाला इतिहास बदलताय? यांचं राजकारण तुम्ही समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक वेळी तुम्हाला गृहीत धरून हे चालणार. काल शिवसेनेतलं कुणी बोललं की महाविकास आघाडी सरकार हे पाहिलं असतं तर बाळासाहेबांना आनंद झाला असता. याच्यावर कहर म्हणजे शरद पवार म्हणतायत आम्ही सकाळी भांडायचो आणि संध्याकाळी जेवायला एकत्र बसायचो. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची क्रेडिबिलिटी घालवताय. शिवसेनेला कळत नाहीये की तुम्ही कुणाबरोबर राहात आहात. लोकांना वाटेल यांचं खोटं खोटं भांडण चालायचं.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com