NCP Merger Saam Tv
महाराष्ट्र

NCP: राष्ट्रवादी विलिनीकरणासाठी कुणाची मध्यस्थी?, महाराष्ट्राच्या माजी मंत्र्यांचे खळबळजनक दावे

Vijay Waddetiwar On NCP: काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणाबाबत अनेक खळबळजनक दावे केले आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेसने हे दावे फेटाळून लावले आहेत.

Priya More

सुप्रीम मसकर, साम टीव्ही

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला पुन्हा जोर धरलाय. पक्ष विलिनीकरणाच्या बैठकांना कधीपासून सुरुवात झाली होती. त्यासाठी कोण मध्यस्थी करत आहे? तसंच कोणत्या अटींवर एनसीपीच्या दोन्ही पक्षांचं विलिनीकरण होण्याची शक्यता आहे? पाहूयात एक रिपोर्ट...

अजित पवारांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरुन दाव्या-प्रतिदाव्यांना ऊत आलाय. मात्र आता या चर्चेत नवा ट्विस्ट आलाय. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत अजित पवारांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ग्रीन सिग्नल दिला होता एवढीच माहिती समोर आली नसून विलिनीकरणाची इनसाईड स्टोरीच विश्वसनीय सुत्रांनी सांगितलीय.

खरं तर विधानसभा निवडणुकीनंतर डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या नागपूर अधिवेशन काळात विलिनीकरणाच्या चर्चांना सुरुवात झाली. त्यानंतर जयंत पाटील आणि अजित पवारांमध्ये अनेक बैठका झाल्या.. तर 5 ऑक्टोबर 2025 रोजी अजित पवारांची राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत अहिल्यानगरमध्ये विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात अमित शहांशी चर्चा केली. या चर्चेनंतर महिनाभराने 14 नोव्हेंबर 2025 ला मोदी-शाहांकडून विलिनीकरणाला ग्रीन सिग्नल देण्यात आला.

यानंतर शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी विलिनीकरणाची चर्चा झाली. एवढंच नाही तर विलिनीकरणाच्या चर्चेचा पुढचं पाऊल म्हणून 16 जानेवारीला अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, हर्षवर्धन पाटील, अमोल कोल्हे आणि जयंत पाटील यांच्यात बैठक झाली. याच बैठकीनंतर सुप्रिया सुळे, अजित पवार आणि सुनील तटकरे यांची बैठक झाली. यानंतर 17 जानेवारीला विलिनीकरण होणारच आहे तर पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना घड्याळावर लढवण्याचा निर्णय झाला.

दरम्यान पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांनी या बैठकांच्या माहितीला दुजोरा दिलाय. तर पटेलांनी मात्र या विषयाला बगल दिलीय. एका बाजूला विलिनीकरणाबाबत नवनवे दावे केले जात असले तरी हे दावे दादांच्या राष्ट्रवादीकडून फेटाळले जात आहेत. मात्र आता या वादात विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही उडी घेतलीय. विजय वडेट्टीवारांनी तर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय.

खरंतर अजित पवारांच्या मृत्यूनंतर सहा दिवसही उलटले नाहीयेत मात्र राजकारणाला ऊत आलाय. त्यामुळे आता राजकारण न करता अजित पवारांच्या तेराव्यानंतर सगळ्या बैठकांचा तपशील जाहीर करणार असल्याचं पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हटलंय. त्यामुळे विलिनीकरणाबाबतच्या नव्या गौप्यस्फोटांनी राजकारणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update:शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यात बैठक सुरु

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गॅस टँकर उलटला, मोठ्या प्रमाणात गॅसगळती, १६ तासांपासून महामार्ग ठप्प, पाहा व्हिडिओ

Ajit Pawar Death: 'अजितदादांचा विमान अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग?', खासदाराच्या विधानाने खळबळ

Homemade Energy Drinks Recipe: घरच्या घरी बनवा 5 प्रकारचे 'एनर्जी ड्रिंक्स', थकवा कायमच निघून जाईल

Pune : पुण्यातील धक्कादायक घटना, भाजप राष्ट्रीय प्रवक्त्याच्या आईला कारने उडवले, CNG पंपावरील व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT