Attack on Uday Samant car
Attack on Uday Samant car saam tv
महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमदार उदय सामंत यांच्यावर हल्ला केला, भाजपच्या आमदाराचा गंभीर आरोप

साम टिव्ही ब्युरो

सांगली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील झालेले माजी मंत्री तथा आमदार उदय सामंत (uday samant) यांच्या कारवर पुण्यात अज्ञात टोळक्याने हल्ला केला. सामंतांच्या कारची काच फोडल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसैनिकांनी हा हल्ला केला असल्याच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर गंभीर आरोप केला आहे. गळ्यात भगवे मफलर घालून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेत घोषणाबाजी करत होते. याच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून उदय सामंत यांच्यावर हल्ला करण्यात आला. ज्या ठिकाणी आदित्य ठाकरे जात आहेत. तिथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. म्हसोबाला नाही बायको, सटवाईला नाही नवरा, अशी अवस्था राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसची झाली आहे, अशी बोचरी टीका पडळकरांनी विरोधी पक्षांवर केली आहे.

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची सुरू असलेली निष्ठा यात्रा आणि आमदार उदय सामंत यांच्या कारवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते गळ्यात भगवा मफरेल घालून घोषणाबाजी करत आहेत.ज्या ठिकाणी आदित्य ठाकरे जात आहेत. तिथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रामुख्याने मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.त्यामुळे हा झंजावात दौरा नाही, एकमेकांना फक्त मदत सुरू आहे.

म्हसोबाला नाही बायको, सटवाईला नाही नवरा,अशी अवस्था राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसची झाली आहे, अशा शब्दांत पडळकरांनी हल्लाबोल केला आहे. पुण्यात शिवसेनेचे कार्यकर्ते नाहीत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीची कार्यकर्ते आहेत.त्यामुळे त्यांच्याकडूनच हा हल्ला झाला असल्याचा,आरोप करत याआधी आपल्यावर हल्ले झाले.ते राष्ट्रवादीकडून झाले होते,असेही आमदार पडळकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.

राज्यात एकनाथ शिंदे गटाने राजकीय बंडाळी करुन शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एवढ्यावरच न थांबता शिवसेनेतील आमदार, खासदार आणि नगरसेवक आपल्या गटात सामील करण्यात यशस्वी झाले. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेच्या माध्यमातून बंडखोर आमदारांच्या मतदार संघात स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांची मोट बांधायला सुरुवात केली आहे. काल मंगळवारी एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांचा पुणे दौरा एकाच दिवशी असल्याने मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badam Oil : स्कीन केअरसाठी बदाम तेलाचे ६ आश्चर्यकारक फायदे

Mumbai News: मुंबईत चिकन शोर्मा खाऊन 12 जणांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू

Maharashtra Politics: मतांसाठी अजित पवारांची मतदारांनाच धमकी? संजय राऊतांचा गंभीर आरोप

Today's Marathi News Live:कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याने घेतला चौदा जणांचा चावा; जखमीमध्ये 8 लहान मुलांचा समावेश

CSK Vs SRH : ऋतुराज गायकवाडची तुफानी फटकेबाजी, शतक अवघ्या २ धावांनी हुकलं; हैदराबादसमोर २१३ धावांचं लक्ष्य

SCROLL FOR NEXT