उत्तम जानकर भारत नागणे
महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांनी थकवले सव्वानऊ कोटीचे कर्ज..!

पंढरपूर अर्बन बँकेने दिली मालमत्ता जप्तीची नोटीस, जानकर यांच्यासह इतर दोघांनी 9 कोटी 30 लाख 26 हजार 933 रुपये कर्ज थकवले आहे.

भारत नागणे

पंढरपूर - सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते पाटील गटाचे कट्टर विरोधक समजले जाणाऱ्या माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक उत्तम जानकर यांची वेळापूर, उघडेवाडी व सांगली जिल्ह्यातील दिघंची येथील स्थावर मालमत्ता जप्त करण्याची नोटीस पंढरपूर बँकेने दिली आहे.

हे देखील पहा -

जानकर यांच्यासह इतर दोघांनी 9 कोटी 30 लाख 26 हजार 933 रुपये कर्ज थकवले आहे. कर्ज वसुलीसाठी बँकेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमाप्रमाणे हुकूमनामा आदेश मिळवला आहे. त्यानुसार बँकेचे विशेष वसुली अधिकारी राहुल जाधव यांनी मालमत्ता जप्तीची नोटीस जानकर यांच्यासह दत्ता ज्ञानेश्वर मदने व प्रदीप शंकर दडस या कर्जदारांना दिली आहे.

जानकरांना जप्तीची नोटीस दिल्याने सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. जानकर यांनी 2019 मध्ये माळशिरस विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती.

त्यापूर्वी जानकर हे भाजप मध्ये होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांचे सलोख्याचे संबंध होते. त्यामुळेच अर्बन बँकेचे अध्यक्ष असलेले भाजप आमदार प्रशांत परिचारक‌ यांनी जानकरांना कर्ज दिले होते. जप्तीच्या नोटीसमुळे राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati : अमरावती जिल्ह्यात चिकनगुनिया आणि डेंग्यूचा कहर, तब्बल ५९२ रुग्णांची नोंद | VIDEO

Maharashtra Live News Update: सरकारच्या मदतीने बियाण्यांचा खर्चही निघत नाही -बच्चू कडू

सरपंचाच्या मुलाचा प्रताप! तरुणाला अमानुष मारहाण करत तोंडावर लघवी केली; आईलाही सोडलं नाही...

Delhi Bomb Threat: शाळेमध्ये बॉम्ब ठेवलाय, विद्यार्थ्याने मेल करत दिली धमकी; तपासातून धक्कादायक कारण आलं समोर

Post Office Diwali Scheme : टपाल खात्याची खास दिवाळी भेट! नोंदणी करून घरबसल्या विदेशात पाठवता येणार 'या' गोष्टी ,जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT