Supriya Sule, PFI , Tuljapur , Tuljabhavani
Supriya Sule, PFI , Tuljapur , Tuljabhavani saam tv
महाराष्ट्र

Video : आरएसएसवर बंदी हवी ? सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला असं वाटतं...

साम न्यूज नेटवर्क

- कैलास चाैधरी

Supriya Sule : पीएफआय (PFI Ban) संघटनेवर केंद्र शासनाने बंदी घातलेली आहे. हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. यावर कुणीही राजकारण करू नये असं मत एनसीपीच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी तुळजापूर येथे व्यक्त केले. दरम्यान पीएफआय वरील बंदीचे खासदर सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्ष समर्थनच केले आहे.

खासदार सुप्रिया सुळे या तुळजाभवानी देवीच्या दर्शनास तुळजापुरातील तुळजाभवानी मंदिरात आल्या हाेत्या. त्यावेळी सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांनी पीएफआय संघटनेवरील बंदी बाबतची आपली भुमिका काय असा प्रश्न विचारला. त्यावेळी सुळे म्हणाल्या पीएफआय वरील बंदी राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. या गाेष्टीचे काेणीही राजकारण करू नये. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याने ताे पारदर्शक पद्धतीने राबविला गेला पाहिजे असेही सुळेंनी म्हटलं.

आरएसएसवर काॅंग्रेसच्या बंदी बाबतच्या मागणीच्या प्रश्नावर सुळे म्हणाल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालावी या मागणीबाबत तुम्ही काँग्रेसलाच विचारा. त्यावर सुळेंनी अधिक बोलण्यास नकार दिला. पीएफआयवर घातलेली बंदी योग्य की अयोग्य या प्रश्नावर मात्र सुळे यांनी हा प्रश्न राष्ट्रीय सुरक्षेचा असल्याचे सांगत अप्रत्यक्ष समर्थन केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Rate 29th April 2024: पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल? जाणून घ्या राज्यातील आजचा भाव

Narendra Modi: PM मोदींची आज पुण्यात सभा, शहरातील अनेक रस्ते राहणार बंद; वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणते?

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जातेय; आम आदमी पक्षाचा गंभीर आरोप

Amit Shah Fake Video: अमित शहांच्या भाषणाचा बनावट व्हिडीओ व्हायरल; भाजप नेते आक्रमक, पोलिसांत गुन्हा दाखल

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, 'या' राशींच्या लोकांसाठी सोमवार ठरणार त्रासदायक; तुमची रास यात नाही ना?

SCROLL FOR NEXT