Dandiya Rass : दांडिया का खेळू दिलं नाही ! तिघांवर हल्ला; एक मृत्यूमुखी

पाेलीसांनी या प्रकरणी कसून तपास सुरु केला आहे.
navratri 2022 , Dandiya , Navi Mumbai
navratri 2022 , Dandiya , Navi Mumbai saam tv
Published On

- सिद्धेश म्हात्रे

Garba : नवरात्र निमित्त राज्यभरात गरबा तसेच दांडियाचे (Dandiya Rass) विविध संस्था, मंडळं यांच्यावतीने आयाेजन करण्यात आले आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात आधार कार्ड पाहिल्याशिवाय गरबा अथवा दांडिया खेळायला येणा-यांना प्रवेश दिला जात नाहीये. दरम्यान नवी मुंबई (navi mumbai) नजीकच्या रबाळे एमआयडीसी परिसरात दांडिया खेळू न दिल्याने तिघांवर हल्ला झाला आहे. यापैकी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समाेर आली आहे. (Navi Mumbai Latest Marathi News)

या घटनेबाबत अधिक माहिती अशी - रबाळे एमआयडीसी भागात नवरात्र उत्सवात वेडेवाकडे कृत्य करणाऱ्या तरुणाला दांडिया खेळू न दिल्याने दांडीया खेळण्यास मज्जाव करणाऱ्या तिघांवर लोखंडी हातोड्याने हल्ला केला. हा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे.

navratri 2022 , Dandiya , Navi Mumbai
Shiv Sena : 'निवडणूक आयोग कोणाच्या घरचं थाेडीच आहे, निश्चित न्याय मिळेल'

या हल्ल्यात जखमी झालेल्या तिघांपैकी आकाश जयस्वाल या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र पटवा असे संशयिताचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

navratri 2022 , Dandiya , Navi Mumbai
Navratri 2022 : गरबा दांडिया खेळण्यास जाणार आहात ? थांबा ! ही बातमी वाचा

जितेंद्र हा वेडेवाकडे नाचत असल्याने दुर्गादेवी समोर असला नाच न करण्याचे सांगितल्यानंतरही वेडवाकडे नृत्य करत असल्याने त्याला मंडपातून बाहेर काढण्यात आले होते. हाच राग मनात ठेऊन जितेंद्रने मध्यरात्री मंडपात झोपलेल्या तिघांना मला दांडीया का खेळू दिला नाही असा जाब विचारत त्यांच्यावर हल्ला केला अशी माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

navratri 2022 , Dandiya , Navi Mumbai
Pune : पुणेकरांनो ! इकडे लक्ष द्या, चांदणी चौक पूल पाडताना शहरातील 'या' मार्गावरील वाहतूक बंद

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com