Sunil Tatkare on Maharashtra Cabinet Expansion  Saam TV
महाराष्ट्र

Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार; भरत गोगावलेंना मंत्रिपद मिळणार? सुनील तटकरे म्हणाले...

Maharashtra Cabinet Expansion: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याचं सुनील तटकरे यांनी सांगितलं.

Satish Daud

Sunil Tatkare on Maharashtra Cabinet Expansion

राज्यात शिंदे-फडणवीस-पवार सरकार स्थापन होऊन जवळपास 2 वर्षांचा कालावधील लोटला. मात्र, अद्यापही सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पूर्णत: पार पडला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त नेमका कधी मिळणार असा प्रश्न भावी मंत्र्यांना पडला आहे. यावर बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सूतोवाच केलं आहे. (Latest Marathi News)

राज्य मंत्रिमंडळचा विस्तार लवकरच पार पडणार असल्याचं असं सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे. गणेशोत्सवाच्या काळात मंत्रिमंडळ विस्तार होणार होता, परंतु काही कारणास्तव तो लांबणीवर पडला झाला नाही. मात्र, आता नजीकच्या काळात तो अपेक्षित आहे, असं तटकरे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर भरत गोगावले यांनी त्यांना साथ दिली. त्यामुळे त्यांचा विचार पक्ष करेल. आमच्याही शुभेच्छा त्यांना असल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, खासदार सुनील तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांच्‍यात मनोमिलन झालं आहे.

रायगडमधील एका कार्यक्रमात दोघेही एकाच रविवारी एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी झालेल्या भाषणात भरत गोगावले यांच्या मंत्रिपदाच्या मुद्द्यावरून शाब्दिक टोलेबाजी करत दोघांनी एकमेकांना चिमटे काढले.

खासदार तटकरे यांच्या दिल्ली वारीचे उदाहरण देत आदिती तटकरे मंत्री झाल्‍या, आमचा काही नंबर लागत नाही. आम्‍ही मंत्री कधी होणार ते आता तटकरे साहेबच सांगतील, असं भरत गोगावले यांनी म्हटलं. दुसरीकडे, नवरात्रीचे दिवस आले आहेत, शपथविधी जवळ आला असेल. मला वाटलं भरतशेठ जॅकेट घालून आले असतील, असा चिमटा तटकरे यांनी गोगावले यांना काढला.

त्याचबरोबर आमच्‍या तुम्‍हाला शुभेच्‍छा आहेतच. विरोधात होतो तेव्‍हाही शुभेच्‍छा होत्‍या. ज्‍याच्‍या नशिबात जे आहे आहे ते मिळणारच आहे, असं खासदार सुनील तटकरे यांनी गोगावले यांना प्रत्युत्तर दिलं. खासदार-आमदारांच्या या शेरेबाजीमुळे उपस्थितांमध्‍ये चांगलाच हशा पिकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray Photo: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र, मराठी माणसाला जे हवं तेच झालं, पाहा PHOTO

Marathi Bhasha Mumbai Worli Dome: जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला | VIDEO

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

SCROLL FOR NEXT