राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार यांच्या इंदापूर येथील बारामती अॅग्रो कंपनीवर प्रदुषण मंडळाने कारवाई केली. येत्या ७२ तासांत कंपनीचे दोन प्लांट बंद करा, अशी नोटीस मंडळाकडून बारामती अॅग्रोला देण्यात आली. ही कारवाई राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यावर पहिल्यांदा आपली प्रतिक्रिया दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. आपल्या गोविंद बाग या निवासस्थानी कार्यकर्त्यांची संवाद साधण्यासाठी शरद पवार दाखल झाले आहेत. यावेळी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार यांनी भाष्य केलं. (Latest Marathi News)
"आरक्षण देताना ज्यांना आरक्षण मिळतं त्यांच्यातील वाटा दुसऱ्यांनी घेऊ नये, अशी अपेक्षा ओबीसींची आहे. त्याची नोंद सरकारला घ्यावी लागेल. राज्य सरकार याबाबत काय निर्णय घेईल, हे येत्या 30-35 दिवसांत कळेल", असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
"केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40% एक्साईज ड्युटी लावली आहे. बांगलादेशात भारताचा सगळ्यात जास्त कांदा जातो. नाशिक धुळे पुणे जिल्ह्याचा काही भाग आणि साताऱ्याचा काही भागातील कांदा देशातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जातो. याला केंद्र सरकारने बंधने घातले आहेत. कांदा हे जिरायत शेतकऱ्याचे पीक आहे, यामुळे याच्यावर बंधन घालणं चुकीचं असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.
कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने लावलेली एक्साईज ड्युटी काढावी असा आमचा आग्रह आहे. उद्या परवा दिल्लीमध्ये याबाबत बैठक बोलावले आहे, यामधून जर योग्य निर्णय घेतला तर आनंदाची गोष्ट आहे नाहीतर शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढणार आहे, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवरील कारवाईबाबत त्यांना पत्रकारांनी विचारला असता, त्यावर मी उत्तर देणार नाही, असं म्हणत पवारांनी या विषयावर बोलायंच टाळलं. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांबाबत केलेल्या विधानाचा देखील पवारांनी चांगलाच समाचार घेतला. प्रकारचे वक्तव्य करणं म्हणजे पत्रकारांना बेज्जत करण्याचा प्रकार आहे. अशा लोकांना काही महत्त्व देऊ नये,असं पवार म्हणाले.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.