AAP-Congress News : INDIA आघाडीत फूट? पंजाबमध्ये काँग्रेस आमदाराच्या अटकेनंतर मल्लिकार्जुन खरगेंचा 'आप'ला इशारा

Punjab MLA Sukhpal Singh Khaira: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आमदार सुखपाल सिंह खैरा यांच्या अटकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.
INDIA
INDIA Saam TV
Published On

Punjab News :

पंजाबमधील काँग्रेस आमदार सुखपाल सिंह खैरा यांच्या अटकेनंतर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये पुन्हा एकदा खडाजंगी पाहायला मिळत आहे. पंजाब काँग्रेसचे नेते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर जोरदार निशाणा साधत आहेत.

दोन्ही पक्षांमधील या भांडणाचा परिणाम विरोधी पक्षांच्या INDIA आघाडीवरही दिसू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही आमदार सुखपाल सिंह खैरा यांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आमदार सुखपाल सिंह खैरा यांच्या अटकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. या घटनेची पूर्ण माहिती अद्याप मिळालेली नसल्याचे खरगे यांनी सांगितले.

खरगे पुढे म्हणाले की, कोणावर अन्याय झाला तर तो फार काळ टिकत नाही. आमच्यावर कोणी अन्याय केला तर तो सहन करणारे आम्ही नाहीत.  (Latest Marathi News)

INDIA
Ravi Rana on Sharad Pawar: 'येत्या १५ दिवसांत शरद पवार PM मोदींना पाठिंबा देतील'; रवी राणा यांचा मोठा दावा

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पंजाब काँग्रेसचे आमदार सुखपाल खैरा यांना 2015 च्या जुन्या ड्रग्ज प्रकरणी चंदीगडमधून अटक करण्यात आली आहे. खुद्द खैरा यांनी फेसबुक लाईव्ह करून ही माहिती दिली होती. पंजाब पोलिसांच्या पथकाने आमदार खैरा यांच्या चंदीगड येथील घरावर छापा टाकून त्यांना अटक केली होती. (Political News)

यापूर्वीही सुखपाल सिंह खैरा यांच्यावर यापूर्वीही कारवाई करण्यात आली होती. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) यापूर्वीही या प्रकरणात खैरा यांना चौकशीसाठी बोलावले होते, जिथून त्यांना अटक करण्यात आली होती. ईडीने आरोप केला होता की, खैरा हे ड्रग प्रकरणातील दोषी आणि बनावट पासपोर्ट रॅकेटचे सह आरोपी आहेत.

INDIA
Mulund Marathi Women Video : मराठी महिलेला घर नाकारणाऱ्या पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल; मुलुंड पोलिसांची कारवाई

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पंजाबच्या राज्यपालांचीही भेट घेतली आणि या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. खैरा यांच्यावर राजकीय सुडबुद्धीने आरोप करण्यात आल्याची टीका काँग्रेस नेत्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com