Maharashtra Political News  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : 'सख्ख्या भावाचे होऊ शकले नाही, ते...'; NCP नेत्याचा रामदास कदम यांच्यावर जोरदार हल्लाबोल

दापोली विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी शिंदे गटातील नेते रामदास कदम यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे.

साम टिव्ही ब्युरो

जितेश कोळी

Sanjay kadam News : दापोली विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी शिंदे गटातील नेते रामदास कदम यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे. 'रामदास कदम हे काय आहेत हे जनतेला माहीत आहे, जे सख्ख्या भावाचे होऊ शकले नाहीत ते जनतेचे काय होणार, असा सवाल करत राष्ट्रवादीचे संजय कदम यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली. (Latest Marathi News)

राष्ट्रवादीचे नेते संजय कदम म्हणाले, 'राष्ट्रवादीने केलेल्या एका आंदोलनात गाढवावर बसवून एका प्रतिकात्मक व्यक्तीची धिंड काढली होती. त्यानंतर रामदास कदम यांनी गाढवावर बसलेली व्यक्ती हुबेहूब आपल्यासारखी दिसते म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणात तारखेला हजर राहिलो नाही म्हणून त्या प्रकरणात न्यायालयाने अटक वॉरंट काढले. आता अटक वॉरंट निघाल्यानंतर जमीन घ्यायला मी बोरिवली न्यायालयात गेलो तर मी फरार झालो म्हणून रामदास कदम ओरड करत आहेत'.

'रामदास कदम आता ज्यांच्या सोबत सत्तेत आहेत, तेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदास कदम यांची उंची किती, बोलत किती, पगार किती हे जाहीर सभेत विचारले होते. पण आज सर्वकाही विसरून रामदास कदम त्यांच्यासोबत सत्तेत बसलेले आहेत, अशी टीका संजय कदम यांनी केली.

'त्यामुळे रामदास कदम हे काय आहेत हे जनतेला माहीत आहे, जे सख्ख्या भावाचे होऊ शकले नाहीत ते जनतेचे काय होणार, असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय कदम यांनी रामदास कदम यांच्यावर निशाणा साधला.

दरम्यान, शिंदे गटातील आमदार योगेश कदम यांच्या गाडीला कशेडी घाटात झालेल्या अपघातानंतर माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असतानाच राष्ट्रवादीचे माजी आमदारांनी मात्र या संशयावर टीका केली आहे. बंगाली बाबाची शिधा दिली नसल्यामुळे हा अपघात झाला का, असा सवाल करत बंगाली बाबा कोणाच्या गाडीतून फिरतो हे सर्वानाच माहिती आहे, असा टोला संजय कदम यांनी रामदास कदम यांचे नाव न घेता लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला सुरूवात, उज्वल निकम न्यायालयात दाखल

Heart attack symptoms women: महिलांमध्ये दिसणारी हार्ट अटॅकची लक्षणं पुरुषांपेक्षा का वेगळी असतात? पाहा महिलांच्या शरीरात कोणते बदल होतात

Pune News: पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, माथेफिरू तरुणाला अटक; उत्तर प्रदेश कनेक्शन उघड

Palghar : पालघरमधील एमआयडीसीत कंपनीला भीषण आग | VIDEO

Maggi History: मॅगीचा शोध कोणी लावला?

SCROLL FOR NEXT