Sakshi Sunil Jadhav
प्रत्येक महिलेला तिच्या श्रृंगारात बांगड्या खूप महत्वाच्या असतात. बऱ्याच जणांना काचेचा बांगड्या घेताना त्यात काय बघायचं हे कळत नाही.
जर तुम्ही योग्य पद्धतीने बांगड्या निवडल्या नाहीत तर त्या लवकर तुटू शकतात किंवा घालायला त्रासदायक ठरू शकतात. यासाठी पुढे काही सोप्या टिप्स दिल्या आहेत.
बांगड्यांचा साइज हाताच्या मापानुसार असावा. सर्व बांगड्या एकाच साइजच्या असतील तर हातावर सुंदर आणि एकसारखा लुक दिसतो.
बांगड्यांमध्ये तडे, चिरा किंवा कडा धारदार तर नाहीत ना, याची खात्री करून घ्या. खराब बांगड्या हाताला इजा करू शकतात.
बांगड्यांची पॉलिश, डिझाइन आणि कारीगरी चांगली असेल तर त्या जास्त काळ टिकतात आणि जास्त आकर्षक दिसतात.
साध्या वापरासाठी हलक्या आणि साध्या बांगड्या योग्य ठरतात, तर सण-समारंभासाठी जड आणि डिझायनर बांगड्या निवडाव्यात.
लग्न, सण किंवा पार्टीसाठी वेगळ्या प्रकारच्या बांगड्या निवडल्यास संपूर्ण लुक उठून दिसतो.
साडी, ड्रेस किंवा लेहेंग्याच्या रंगाशी जुळणाऱ्या बांगड्या तुमचा लूक जास्त खुलवतात.