Sakshi Sunil Jadhav
काहीतरी गडबडीच्या घटना घडतील असा दिवस सांगतो आहे. उतावळेपणा त्रासदायक ठरू शकेल. निर्णय घेताना योग्यच घ्या. वाहनांपासून धोका संभवतो आहे. काळजी घ्या .
प्रेमामध्ये सारं काही अलबेल चालू आहे असे वाटत असताना "दुधात मिठाचा खडा" पडेल. प्रियकरा बरोबर थोडीशी वाद-विवाद होण्याची शक्यता आहे.
सामाजिक क्षेत्र आणि वक्तृत्व यांचा खूप जवळचा संबंध आहे. आपल्या बोलण्यामुळे इतरांना आपलेसे कराल.
प्रेमामध्ये गहिरे पण येईल. संतती सौख्य, नातवंड सौख्य यासाठी दिवस चांगला आहे. उपासनेच्या माध्यमातून काहीतरी चांगले घडेल. चांगल्या वार्ता कानी येतील.
मोडेन पण वाकणार नाही असा आपला बाणा आहे आज मात्र इतके कुणात गुंतूच नका की ज्याच्यामुळे त्रास होईल. "आपण भले, आपले काम भले" असा दिवस काढल्यास कामे सुरळीत होतील.
कोर्टाच्या कामामध्ये यश मिळेल. नको असलेल्या कटकटी मागे लागल्या असतील तर आज त्यातून अलगद बाहेर याल. दिवस चांगला आहे.
या राशीच्या स्त्रियांना स्त्रीविषयक आजार होतील. जवळच्या व्यक्तीकडून घातपात झाल्यासारख्या गोष्टी होतील. महत्त्वाच्या ऐवज, जिन्नस ,पैसे, चोर आणि चोरीपासून स्वतःला संभाळा .
कुलदेवतेच्या आशिर्वादाने दिवस उजळून निघेल. मनात ठरवलेल्या गोष्टी घडतील. क्रीडा क्षेत्रात विशेष प्रगती घेऊन आलेला दिवस आहे.
शाकंबरी देवीचा उत्सव सुरू होत आहे.घरामध्ये एखादा मंगल कार्य होईल. अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती वाढेल. देवी उपासनेने दिवस समृद्ध होईल. मातृसख चांगले आहे.
एक वेगळा हुरूप आणि उमेद आज कामासाठी असेल. मोठ्या व्यक्तींच्या सहकार्याने पुढे जाल. व्यवसायामध्ये नवीन काहीतरी घडामोडी घडतील.
न बोलता सारे काम आज कराल. कुटुंबाची साथ चांगली असेल.खाण्यापिण्याची मांदियाळी असेल. तब्येत मात्र जपावी लागेल.
मीपणा सोडून आज वागणे चांगले असेल अर्थात मीपण जपाल, स्वतःमध्ये मग्न असाल एक आनंददायी प्रवासाची सुरुवात म्हणजे आजचा दिवस आहे.