Rohit Pawar News : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाला मिळणार? शिंदे गटाचे १६ आमदार पात्र की अपात्र? अशा विविध मुद्द्यावरून राज्यात ठाकरे आणि शिंदे गटामध्ये सत्तेचा संघर्ष सुरू आहे. यातील पक्षचिन्हाबाबतचा निर्णय कोर्टाने निवडणूक आयोगाकडे सोपावला आहे. तर आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणी सध्या सुप्रीम कोर्टात सुरू आहे. एकीकडे कोर्टात आमचाच विजय होणार, असा दावा दोन्ही गटांकडून केला जात असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. (Maharashtra Political News)
आमदार रोहित पवार यांनी राज्यातील सत्तासंघर्षाबाबत ट्विट करून सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांनी सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीचा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील आमदारांवर कसा परिणाम जाणवत आहे, याबाबत भाष्य केलं आहे. रोहित पवारयांनी केलेलं हे ट्विट राज्यात पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत देत आहेत का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
रोहित पवारांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलंय?
"भूकंपापूर्वी प्राणी आणि पक्षांचं वर्तन बदलत असतं. एकप्रकारे ती भूकंपाची पूर्वसूचनाच असते. असंच एक वेगळ्या प्रकारचं माझं आजचं निरीक्षण आहे. सत्ताधारी पक्षातील अनेक सहकारी आमदारांची आज कामानिमित्त मुंबईत असताना भेट झाली असता काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या." असं रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले.
"(शिंदे गट) या आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि बॉडी लँग्वेज पडलेली होती. सत्ताधारी असूनही काही आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटता येत नसल्याचं समजलं. शिवाय अर्थ विभागातून विशिष्ट पक्षाच्याच फायली मंजूर होत असून त्याचा वेगही अचानक वाढल्याचं समजलं. ही कोणत्या भूकंपाची चिन्ह असावीत?", असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. (Latest Marathi News)
सुप्रीम कोर्टात आज काय होणार?
राज्यातील सत्तासंघर्षाबद्दल सलग २ दिवसांपासून सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे.मंगळवारच्या सुनावणीमध्ये ठाकरे गटाकडून युक्तिवाद मांडण्यात आला होता. त्यानंतर बुधवारच्या सुनावणीत शिंदे गटाचे वकील हरिश साळवे, नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद मांडला. आज दोन्ही गटांचा अंतिम युक्तीवाद असून हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवावं की नाही याबाबत कोर्ट निर्णय घेणार आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.