Ajit pawar
Ajit pawar  saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar : मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवार यांची शिंदे सरकारवर जोरदार टीका; 'प्रत्येक फाईल...'

संजय डाफ

नागपूर : राज्यात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दोघेच सरकार चालवत आहे. या दोघांच्या मंत्रिमंडळाकडूनच राज्यातील प्रश्नांवर निर्णय घेतले जात आहेत. तसेच राज्यात नवं सरकार स्थापन करून चार आठवड्यांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र, मंत्रिमंंडळ विस्तार न झाल्याने दोघांच्या मंत्रिमंडळाकडून अतिवृष्टी झालेल्या भागात शेतकरी आणि नागरिकांना मदत मिळत नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे. (Ajit Pawar News In Marathi)

अजित पवार म्हणाले, 'मंत्रिमंडळ विस्तार होत नाही आहे. दोघे म्हणत आहे की, आम्ही दोघे काम करत आहे. मात्र, हे शक्य नाही. प्रत्येक फाईल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे जाणार असेल तर ते शक्य नाही. त्यांना एवढं मोठं बहुमत मिळालं आहे, त्यांनी ते दाखविले आहे. मग मंत्रिमंडळ विस्तार का करत नाही. आजही मी काही मुद्द्यांवरून मुख्यमंत्र्यांना भेटलो, त्यांना विचारले मंत्रिमंडळ विस्तार का करत नाही. ते म्हणाले, आम्ही करतो. मात्र, ते विस्तार करतो असे म्हणत असले तरी ते होत नाही, हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. कदाचित त्यांना दिल्लीतून परवानगी मिळत नसावी की इतर काही समस्या आहे, हे माहित नाही'.

अजित पवार पुढे म्हणाले, 'लवकर अधिवेशन बोलवा अशी आमची मागणी होती. मात्र, ते ही बोलावले जात नाही आहे. त्यामुळे जशी मदत शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, तशी मदत मिळताना दिसत नाही'. उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवरील टीकेवर भाष्य करताना पवार म्हणाले, 'उद्धव ठाकरे यांनी एककीकडे मुलाखत द्यायची आणि त्याला मग उत्तरे दिली जातात. यातून राज्याचे प्रश्न सुटणार नाही ही वस्तुस्थिती आहे'.

'सत्ता बदल होताना मोठ्या प्रमाणावर आश्वासन देण्यात आली, त्याची पूर्तता कठीण होत आहे म्हणून मंत्रिमंडळ विस्तार होत नाही का ??? असे ऐकले आहे. भाजपकडे 115 आमदार आहेत. भाजप कार्यकारणीमधील रोख लक्षात घेतला तर आमदारांनी त्यागाची भावना ठेवा असे सांगण्यात आले. तिकडे शिंदे गटातूनही कोण मंत्री होणार कोण राज्यमंत्री होणार असे अनेक प्रश्न आहेत, त्यामुळे विस्तार होत नसावे, असे मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले.

'ओळा दुष्काळ जाहीर करा अशी मागणी आधीच केली आहे. पहिली पेरणी वाया गेली आहे, दुबार पेरणीचे संकट आहे. शेतातील रोपे गळून गेली आहे. रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. पूल वाहून गेले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आले होते. मात्र, गडचिरोलीत आतील भागात जाऊ शकले नाही. एवढ्या दिवसात जशी मदत मिळणे अपेक्षित होते, तशी झाली नाही, असे राज्यातील अतिवृष्टीवरून अजित पवार म्हणाले. 'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 'एसडीआरएफ'चे निकष बाजूला ठेवून आम्ही मदत करत होतो. मराठवाड्यात गेल्या काही दिवसात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे', असे ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Surya Gochar: ९ दिवसांनंतर सूर्यासारखे चमकेल 'या' ६ राशींच्या लोकांचे भाग्य

Horoscope Today : मेषसह ५ राशीच्या लोकांनी आज 'या' गोष्टी करणं टाळा; वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Politics: सातारा, दुष्काळ आणि शरद पवार; साताऱ्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

SCROLL FOR NEXT