Eknath shinde
Eknath shinde saam tv

Buldhana : त्रस्त शेतकऱ्याचा थेट मुख्यमंत्री शिंदे यांना कॉल; ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल

बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना फोन केला आणि आपले गाऱ्हाणे मांडले. या दोघांची कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

बुलडाणा : शिवसेनेतील बंडखोरीनंतर बंडखोर आमदार आणि कट्टर शिवसैनिक, पदाधिकारी यांचे ' प्रेमळ संवाद रंगले आणि व्हायरलही झाले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचा नागरिकांना अडचणीत मदत करतानाचा काही व्हिडिओ आणि कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे ते सर्व सामान्यांचे मुख्यमंत्री आहेत अशी भावना शेतकरी वर्गात देखील जागृत झाली. त्यामुळेच वन्य प्राण्यांनी त्रस्त झालेल्या बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना फोन केला आणि आपले गाऱ्हाणे मांडले. या दोघांची कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Eknath Shinde News)

Eknath shinde
'मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी...'; NCP च्या आमदाराने शिंदे सरकारला दिला मंत्रिमंडळ विस्तारासाठी सल्ला

बुलडाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव राजा तालुक्यातील वाकी बुद्रुक,  बायगाव , मेंडगाव,  पिप्रीआंधळे , अंढेरा, सेवानगर,  धोत्रा नंदई,  वाकी खुर्द , डोद्रा , अंचरवाडी या गावाजवळ वनविभागाचे जंगल असून यामध्ये नीलगाय हे शेतातील पीक पूर्णपणे नष्ट करतात. त्यामुळे शेतकरी वारंवार वन विभागाकडे तक्रारी करतात. मात्र, या वन्य प्राण्यांचा कुठलाही बंदोबस्त होत नसल्याने अखेर त्रस्त झालेल्या वाकी बुद्रुक येथील शेतकरी उद्धवराजे नागरे यांनी काल रात्री 8 वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच कॉल केला.

Eknath shinde
Eknath Shinde : पोलिसांच्या घरांसाठी मुख्यमंत्र्यांनी उचललं महत्वाचं पाऊल; दिले 'हे' निर्देश

उद्धवराजे यांनी आपल्या शेतातून पिकांचे वन्य प्राण्यापासून रक्षण करत असतानाच फोन केला आणि आपले गाऱ्हाणे मांडले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि आपल्या सोबतच्या अधिकाऱ्याला फोन देऊन माहिती घेण्यास सांगितले. या शेतकऱ्यांस तुमच्या जिल्ह्यातील वन अधिकाऱ्यांना , जिल्हाधिकाऱ्यांना कारवाई करायला सांगतो,  तुमचं नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी संबंधितांना बोलतो, असे बोलून कारवाईचे आश्वासन दिलं. सध्या या दोघांची ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याप्रती भावनिक वातावरण निर्माण होत असतांनाच दुसरीकडे एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण होत आहे.

शेतकरी व मुख्यमंत्री यांचा फोन वरून संवाद

शेतकरी - आमच्या बायगाव बुजरूक, बेंडगाव, अंढेरा धोत्रा, नीलगायी भरपूर येतात.. शेताच नुकसान करतात

मुख्यमंत्री - काय झालं ?

शेतकरी - शेताच नुकसान करते नुकसान

मुख्यमंत्री - शेताच नुकसान होतंय नीलगायीमुळे

शेतकरी - हा हा...

मुख्यमंत्री - अच्छा.. कुठला एरिया..देऊळगावराजा तालुक्यामधील बेंडगाव, बायगाव

मुख्यमंत्री - बेळगाव

एक मिनिट एक मिनिट..घ्या

अधिकारी - हॅलो, हा सांगा आपला कुठला भाग आहे ?

शेतकरी - बेंडगाव, बायगाव अंढेरा , धोत्रा,

शेताच खूप मोठ नुकसान होतंय साहेबाला सांगा..

आपल्या तक्रारीची नोंद घेतली आहे, आम्ही कलेक्टर व इतर अधिकाऱ्यांना माहिती देत आहोत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com