jitendra awhad  saam tv
महाराष्ट्र

Jitendra Awhad News: 'चौकात ८-१० गाई आणून ठेवाव्यात..' जितेंद्र आव्हाडांचे टीकास्त्र, म्हणाले; 'मागुन मिठी मारली तर...'

१४ फेब्रुवारी हा दिवस ‘काऊ हग डे’ अर्थात ‘गाईला आलिंगन दिन’ म्हणजेच गाईला मिठी मारून साजरा करावा असे आवाहन केले आहे.

Gangappa Pujari

Cow Hug Day: १४ फेब्रूवारी हा दिवस देशभरात व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) म्हणून साजरा केला जातो. तरुणाईमध्ये व्हॅलेंटाईन डे चा मोठा उत्साह पाहायला मिळतो. त्यामुळे या दिवसाची तरुणाई नेहमीच वाट बघत असते.

मात्र यावेळी केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने प्रेमवीरांना सल्ला देत १४ फेब्रुवारी हा दिवस ‘काऊ हग डे’ अर्थात ‘गाईला आलिंगन दिन’ म्हणजेच गाईला मिठी मारून साजरा करावा असे आवाहन केले आहे. त्यासाठी खास पत्रदेखील या विभागाच्या वतीने काढण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली आहे.(Valentine Day)

याबाबत अधिक माहिती अशी की, केंद्र सरकारने व्हॅलेंटाईन डे दिवशी गायिला आलिंगन दिन म्हणून साजरा करण्याच्या केलेल्या आवाहनावर जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली आहे.

याबद्दल बोलताना त्यांनी "नव्या पिढीत असणारे तरुण आणि तरुणी व्हॅलेंटाईन डे साजरा करतात. व्हॅलेंटाईन डे म्हणजे एकमेकांच्या बरोबर असलेली मैत्री, प्रेम भावना. माझी सरकारला एक मागणी आहे एखाद्या चौकात 8 ते 10 गाई आणून ठेवाव्यात," असा टोला राष्ट्र वादी चे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला लगावला आहे. Jitendra Awhad)

त्याचबरोबर याबद्दल पुढे बोलताना त्यांनी "तिला मिठी कशी मारायची हे सुद्धा सांगा कारण, मागून मिठी मारली की लाथ मारेल आणि पुढून मिठी मारली तर शिंग मारेल," असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान केंद्र सरकारच्या या आवाहनावर अजित पवारांनीगी टीका केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tharala Tar Mag: 'ज्योती ताईंच्या आठवणी जाग्या...'; पूर्णा आजीच्या एन्ट्रीवर जुई गडकरी झाली भावूक, म्हणाली- 'रोहिणी ताई सेटवर...'

Maharashtra Live News Update : महाराष्ट्राच्या यादीत ९६ लाख बोगस मतदार - संजय राऊत

करिना- ऐश्वर्याशी तुलना, बेदीच्या मुलीने मार्केट खाल्लं, फोटो झाले तुफान व्हायरल

Beed : दिवाळीत गोरगरिबांना किडे, बुरशीयुक्त तांदूळाचे वाटप; बीड तालुक्यातील संतापजनक प्रकार

Pune Shaniwar Wada : पुण्यातील शनिवारवाड्यात नमाज पठण? Video

SCROLL FOR NEXT