Sanjay Raut News: नाना पटोलेंनी पद सोडलं नसतं तर सरकार पडलं नसतं; संजय राऊत स्पष्टच बोलले

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरकार पडलं यासाठी नाना पटोले यांना जबाबदार धरलं.
Nana Patole-Sanjay Raut
Nana Patole-Sanjay RautSaam Tv

Mumbai News : महाविकास आघाडी सरकार कसं पडलं? नक्की चूक कुठे झाली? महाविकास आघाडीसाठी हा संशोधनचा विषय आहे. त्यासाठी तिन्ही पक्ष आपआपल्यापरिने परीक्षण करत असतील. मात्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरकार पडलं यासाठी नाना पटोले यांना जबाबदार धरलं.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात नाना पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी होती. मात्र मध्येच त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. जर विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर नाना पटोले असते तर चित्र वेगळं दिसलं असतं. परंतु हे अध्यक्षपद अचानक रिकामं झाल्यानंतर विरोधकांना संधी मिळाली, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

Nana Patole-Sanjay Raut
Congress News: नाना पटोलेंविरोधात काँग्रेसमध्ये एकजूट, दिल्लीत हालचालींना वेग

राज्यपालांनी आणि भाजपने सरकार पाडण्याचा डाव आधीच आखला होता. त्यात नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर त्यांना ती संधी चालून आली आणि त्यानंतर राज्यपालांनीही विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होऊ दिली नाही. त्याचा फटका आता बसला हे सत्य आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

Nana Patole-Sanjay Raut
Ahmednagar News: अल्‍पवयीन मुलांनी फोडले मोबाईल शॉपी; पोलिस तपासात उलगडा

एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण...

एकनाथ शिंदे माजी सहकारी म्हणून एक व्यक्ती म्हणून वाढदिवसाला त्यांना आम्ही शुभेच्छा देतच असतो. आम्ही राजकीय शत्रू आहोत आणि शत्रू कायम राहील. ज्या पद्धतीन त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना फोडून शिवसेनेचे अस्तित्व नष्ट करण्या प्रयत्न केला आणि सुरु आहे, त्याविरुद्ध लढाई चालूच राहिल, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com